मुंबई पोलीस शिपाई पदाचा निकाल लागला अन् साते गावात आनंदाला पारावर राहिला नाही, कारण ही तसेच होते. पुणे जिल्ह्यातील मावळ मधील छोट्याशा साते गावातील सानिका मारुती काजळे आणि अभिषेक मारूती काजळे ह्या सख्ख्या बहीण भाऊंनी पोलीस भरती मध्ये बाजी मारली.
अभिषेक आणि सानिका दोघांची संपूर्ण पंचक्रोशीत चर्चा रंगली आहे. त्यांच्या आईच्या आनंदाला तर पारावर उरला नाही. आनंदाने सर्वांच्या डोळ्यात पाणी आले होते. ( Sanika Kajale and Abhishek Kajale from Sate village were simultaneously selected in Mumbai Police Force Maval Taluka )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
घरातील सर्व मंडळी खुश झाली. मुलांच्या कष्टाचे चीज झाले असे सर्व बोलत होते. अभिषेक आणि सानिका यांच्या घरची परिस्थिती जेमतेम, आई गावातील एका पोल्ट्री कंपनीमध्ये काम करत आहे आणि वडील कै. मारूती काजळे यांचे सानिका लहान असतानाच निधन झाले. परंतू पैलवान मारूती काजळे हे नाव मात्र कधीच कोणी विसरू शकत नाही. कारण कुस्ती क्षेत्रात त्यांचे नाव होते तसेच पोहण्यात तरबेज होते.
अभिषेक चे कुटुंब मुळचे चिखलचे गावचे पण लहानपणापासून साते गावात मामाकडे राहायला आहे. दोघांचेही प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साते येथे पूर्ण झाले. माध्यमिक शिक्षण जय शिवराय प्रतिष्ठान संचलित न्यू इंग्लिश स्कूल साते येथे आणि कॉलेज व्ही. पी. एस. कॉलेज लोणावळा येथे पूर्ण केले. अभिषेक ने नवनीत करियर अकादमी-कामशेत येथे तर सानिका ने शौर्य अकादमी-वडगाव येथे पोलीस भरतीचे प्रशिक्षण घेतले. सातत्य, अभ्यास, जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिक प्रयत्न या पंचसुत्री च्या जोरावर ह्या दोघांनी यश संपादन केले.
प्रतिकूल परिस्थितीतही आई श्रीमती वंदना मारूती काजळे तसेच मामा अंनता चंद्रकांत आगळमे (सर) यांनी कशाची कमी पडू नाही दिली. आईने काबाडकष्ट केले आणि मुलांना लहानाचे मोठे केले, शिक्षण सोबत संस्कारही दीले. मुलांनीही कोणता हट्ट आईला कधीच केला नाही. आईच्या कष्टाची जाण सतत ठेवली त्यामुळे आजच्या यशामुळे त्यांना खुप आनंद झाला. गावातील बरीच मुले पोलीस भरती साठी प्रयत्न करत आहेत तेही लवकरच यशस्वी होतील कारण आता सर्वांनी ठरवलंय हा प्रवास यशस्वी करायचाच.
या परीक्षेत यश संपादन केल्यानंतर सदर विद्यार्थी आणि पालक, शिक्षक, मित्र परिवार, नातेवाईक या सर्वाँना आनंद होणे साहजिकच आहे. भविष्यात हे सर्व मोठे अधिकारी बनतील अशी भावना गावकऱ्यांची आहे.
हेही वाचा – कातवी गावातील ‘पहिली महिला पोलिस’ बनली ‘क्षितिजा चव्हाण’, मावळकन्येवर होतोय शुभेच्छांचा वर्षाव
तसेच ह्याच परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात महाराष्ट्र मुंबई पोलीस पदाला गवसणी घातली आहे, तो म्हणजे ओमकार भाऊ भुंडे. अतिशय हुशार आणि आदर्श युवक, शिव व्याख्याते या नावाने ओळख असलेला ओमकार गावातील जिल्हा परिषद मध्ये शिकला, उच् माध्यमिक शिक्षण गोल्डन ग्लेड्स हायस्कूल, कांब्रे मावळ आणि कॉलेज व्ही.पी.एस.लोणावळा येथे तर पोलीस भरती प्रशिक्षण नवनीत अकादमी, कामशेत येथे पुर्ण केले. ओमकार नेही पहिल्या प्रयत्नात यश प्राप्त केले म्हणून घरच्या सर्वांनी आनंद व्यक्त केला.
#महाराष्ट्र पोलीस दलात निवड झालेल्या मावळ तालुक्यातील सर्व युवक-युवतींचे हार्दिक अभिनंदन! सातत्याने कष्ट करुन, प्रत्येक परिस्थितीला सामोरे जाऊन तुम्ही मिळवलेल्या या घवघवीत यशाबद्दल तुमचे खूप कौतुक व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा #maharashtrapolice #proud #Congratulations pic.twitter.com/cG9cyxQQal
— Sunil Shelke (@shelkesunilanna) May 19, 2023
ब्राम्हणवाडी (साते) येथील विशाल पवार यांचीही मुंबई पोलीस पदी निवड झाली आणि गेल्या महिन्यात मोहितेवाडी (साते) येथील नागेश मोहिते यांची पुणे ग्रामीण पोलीस मध्ये निवड झाली या सर्वांचे ग्रामस्थांनी अभिनंदन केले. पोलीस शिपाई ते पोलीस अधिकारी असा सन्मान देणारी ही परीक्षा असल्याने परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
तुकाराम बाळू आगळमे म्हणाले,” या सर्व मुलांनी ऐतिहासिक साते गावच्या वैभवात भर केली आहे, पुणे जिल्ह्यात गावाचे नाव रोशन केले त्याबद्दल गावकऱ्यांनी कौतुक केले आणि अजुन विद्यार्थी अशाच सरकारी परीक्षा देवून एक कर्तव्य दक्ष अधिकारी तयार होवो हीच ग्रामस्थांनी भावना दिसून येते.
अधिक वाचा –
– आढले खुर्द ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत भाजपाचे महेंद्र भोईर विजयी! विरोधी उमेदवाराचा ‘इतक्या’ मतांनी पराभव
– अखेर न्याय मिळालाच..! पवना धरणग्रस्तांसाठी आनंदाची बातमी, बाधित शेतकर्यांना प्रत्येकी चार एकर जमीन मिळणार