वडगाव मावळ येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सिद्धेश ढोरे यांचा शुक्रवार (दिनांक 19 मे) रोजी वाढदिवस होता. त्यांच्या वाढदिवसानिमित्त मोरया प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत सिद्धेश ढोरे यांच्या वतीने वडगाव शहरातील एका गरजू कुटुंबाला उद्योग व्यवसायासाठी हातगाडी भेट देण्यात आली.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
सिद्धेश राजाराम ढोरे यांनी वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत अनावश्यक खर्च टाळून मोरया प्रतिष्ठानच्या माध्यमातून स्वखर्चाने वडगाव शहरातील एका कष्टकरी आणि होतकरू असलेल्या थोरात कुटुंबीयांना फिरता व्यवसाय करण्यासाठी हातगाडी आणि भाजीपाल्यासह वजनकाटा इत्यादी गोष्टी भेट दिल्या, याचे सध्या सर्वत्र कौतूक होत आहे.
यावेळी मावळ तालुका काँग्रेस मा तालुकाध्यक्ष बाळासाहेब ढोरे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सुभाषराव जाधव, नगराध्यक्ष मयूर ढोरे, मा उपसरपंच बापूसाहेब वाघवले, अरुण चव्हाण, पोटोबा देवस्थान ट्रस्ट विश्वस्त, नगरसेवक राजेंद्र कुडे, सामाजिक कार्यकर्ते सुरेशभाऊ चव्हाण, शांताराम कुडे, सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय ढोरे, सुरेश जांभुळकर, सामाजिक कार्यकर्ते सुरेश कुडे, कदम मामा, पत्रकार विजय सुराणा, गणेश जाधव, अरूण कालेकर, विशाल शिंदे, सौरभ ढोरे, सुमीत ढोरे, गौतम सोनवणे, खंडुजी जाधव, प्रणव ढोरे, राहील तांबोळी आणि मोरया प्रतिष्ठानचे सदस्य तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा – प्रेरणादायी..! मावळातील या बहीण-भावाची जिल्ह्यात होतेय चर्चा, एकाचवेळी पोलीस दलात निवड, नक्की वाचा
वडगाव शहरातील या गरजू कुटुंबाला व्यवसायासाठी देण्यात आलेल्या हातगाडीचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून नूतन व्यवसायासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी थोरात कुटुंबियांनी मोरया प्रतिष्ठानचे तसेच सिद्धेश ढोरे यांचे मनपूर्वक आभार व्यक्त केले.
अधिक वाचा –
– आढले खुर्द ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत भाजपाचे महेंद्र भोईर विजयी! विरोधी उमेदवाराचा ‘इतक्या’ मतांनी पराभव
– अखेर न्याय मिळालाच..! पवना धरणग्रस्तांसाठी आनंदाची बातमी, बाधित शेतकर्यांना प्रत्येकी चार एकर जमीन मिळणार