मावळ लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे व्यापारी संमेलन लोणावळा शहरातील मॅपल रिसॉर्ट इथे यशस्वीपणे पार पडले. मावळ मतदारसंघात मोदी@9 सेवा, सुशासन व गरिब कल्याण या अजेंड्यानुसार महा-जनसंपर्क अभियान प्रभावीपणे राबवण्यात येत आहे, अशी माहिती मोदी @9 मावळ लोकसभेचे व्यापारी संमेलन संयोजक जितेंद्र बोत्रे यांनी दैनिक मावळला दिली. ( BJP Maval Lok Sabha Constituency business meeting Vyapari Sammelan Held in Lonavala City )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
भारताचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला 9 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त मोदी सरकारचे ऐतिहासिक निर्णय, विविध विकास कामे आणि जनहितार्थ सुरु असलेल्या अनेक योजना यांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवावी, याकरिता देशभरातील सर्व लोकसभा मतदारसंघांमध्ये महा-जनसंपर्क अभियान आणि मोदी @9 अभियान सुरु आहे. याच अभियानाचा एक भाग म्हणून मावळ लोकसभा मतदारसंघात पिंपरी, चिंचवड आणि मावळ विधानसभेतील व्यापाऱ्यांचे ‘व्यापारी संमेलन’ लोणावळा शहरात मावळ लोकसभाचे समन्वयक संजय उर्फ बाळाभाऊ भेगडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.
यावेळी राज्याचे माजी राज्यमंत्री तथा भाजपाचे सध्याचे प्रदेश उपाध्यक्ष बाळा भेगडे आणि विधान परिषदेच्या विद्यमान आमदार उमा खापरे यांनी उपस्थित व्यापाऱ्यांचे प्रश्न जाणून घेतले आणि त्यांना मार्गदर्शन केले. तसेच महामंडळ अध्यक्ष अमित घोडके, भाजपा महिला आघाडी – मावळ तालुका अध्यक्ष सायली बोत्रे, लोणावळ्याच्या माजी नगराध्यक्ष सुरेखा जाधव, प्रदेश सचिव वर्षा डहाळे आदींनी मनोगत व्यक्त केली.
हेही वाचा – मोदी@9 : भाजपाचे मावळ तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडेंच्या उपस्थितीत ‘घर घर मोदी’ अभियानाचा वडगाव शहरात प्रारंभ
कार्यक्रमास माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, लोणावळा शहर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष दिलीप गुप्ता, तळेगाव शहर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष निर्मल ओसवाल, सागर शर्मा, सुभाष सिंगल, मावळ पंचायत समितीचे माजी सभापती गुलाबराव माळसकर, माजी नगरसेवक मोरेश्वर शेडगे, मा जिल्हा परिषद सदस्य भाऊ गुंड, लोणावळा शहर भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष रामविलास खंडेलवाल, तळेगाव शहर भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष रवींद्र माने, पुणे जिल्हा भाजपा सरचिटणीस अविनाश बवरे यांसह व्यापारी सहकारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. ( BJP Maval Lok Sabha Constituency business meeting Vyapari Sammelan Held in Lonavala City )
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे व्यापारी संमेलनाचे संयोजक विशाल वाळुंजकर, मावळ विधानसभा मतदारसंघाचे व्यापारी संमेलनाचे संयोजक नामदेव कोंडे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार चिंचवड विधानसभा मतदार संघाचे संयोजक राजेंद्र चिंचवडे यांनी मानले.
अधिक वाचा –
– कौतुकास्पद! शिवशंभो प्रतिष्ठानकडून जवण येथील अंगणवाडी आणि जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप
– ‘आदिपुरुष’ सिनेमावर बंदी घाला, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या खासदाराची मागणी, केंद्रीय मंत्र्यांना दिले निवेदन