भारतीय जनता पार्टी पक्ष कार्यालय, वडगाव मावळ इथे आज (सोमवार, दिनांक 21 ऑगस्ट) भाजपाचे तालुकाध्यक्ष तथा विधानसभा निवडणूक प्रमुख रविंद्र भेगडे यांनी तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन बूथ सशक्तीकरण अभियान, सरल ऍप नोंदणी, जिल्हा परिषद गट निहाय कार्यकर्ता मेळावा, घर घर संपर्क अभियान, नव मतदार नोंदणी अभियान अशा विविध संघटनात्मक कार्यक्रम राबविण्याबाबत चर्चा करून उपस्थितांना मार्गदर्शन केले. ( BJP maval taluka officials held meeting at party office Vadgaon )
या बैठकीमध्ये वरील सर्व संघटनात्मक कार्यक्रम बूथ स्तरावर यशस्वीपणे राबविण्यासाठी जिल्हा परिषद गट निहाय कार्यकर्ता संवाद मेळावा घेण्याचे नियोजन केले असून 24 आणि 25 ऑगस्ट रोजी हे मेळावे होणार आहेत. सदर मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी राज्यमंत्री बाळा भेगडे आणि भाजपाचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष शरद बूट्टे – पाटील उपस्थित राहणार असल्याची माहिती रविंद्र भेगडे यांनी दिली.
यावेळी माजी पं. स. सभापती गुलाबराव म्हाळसकर, माजी उपसभापती शांताराम कदम, मावळ विधानसभा संयोजक रामदास गाडे, महिला आघाडी अध्यक्षा सायली बोत्रे, वडगाव शहर अध्यक्ष अनंता कुडे, सरचिटणीस मच्छिंद्र केदारी, माजी सभापती गणेश गायकवाड, राजुभाऊ मुऱ्हे, सुमित्रा जाधव, गणेश कल्हाटकर, युवा मोर्चा कार्याध्यक्ष गणेश ठाकर, सरपंच माऊली गुंड, सरपंच दत्ता माळी आदी प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– उपवास म्हणजे काय? तो का आणि कसा करावा? अधिक मास अन् श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने वाचावा असा लेख
– “मावळ तालुक्यातील प्रत्येक गावाच्या विकासासाठी मी कटिबद्ध” : आमदार सुनिल शेळके यांचा पवन मावळवासीयांना शब्द
– आपण चंद्रावर पोहोचलो पण रोजच्या जातीय द्वेषाचे, जातीवादाचे काय? प्रकाश आंबेडकर यांचा रोकडा सवाल!