भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) चांद्रयान 3 च्या यशाचे कौतुक आहे आणि प्रत्येक भारतीय नागरिकाला अभिमान वाटेल असेच काम आहे. ह्या यशाबद्दल इस्रोच्या संपूर्ण टीमचे मनःपुर्वक अभिनंदन. पण, चंद्रावर यान पाठविणाऱ्या आपल्या देशातील जातीयवाद, जातीय द्वेष आणि त्याला बळी पडणाऱ्या मृत्यूचे काय? या वास्तावाबद्दल आपण कधी बोलणार आहोत? असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
त्यांनी ट्विट करत देशातील महत्त्वाचे प्रश्न ऐरणीवर मांडून देशांतर्गत व्यवस्थेची यादीच मांडली. यासोबतच त्यांनी वास्तव दर्शवणारे फोटोही एकत्र जोडले आहेत. ते म्हणाले की, अजूनही भारतात अनेक ठिकाणी हाताने मैला उचलला जातो. हे लाजिरवाने काम आजही सुरूच आहे. जातीय भेदभाव, दलित, आदिवासी, ओबीसींवरील अत्याचाराच्या, भेदभावाच्या घटना दिवसेंदिवस वाढताय. ( Prakash Ambedkar criticized the caste system in India )
मुस्लिम, ख्रिश्चन आणि इतर अल्पसंख्याक समुदायंवरील हल्ले आणि त्यांची वाढती असुरक्षितता. बलात्कार, लैंगिक अत्याचार आणि स्त्रिया व मुलींवरील हिंसाचाराचे वाढते प्रमाण, तुटपुंजी आणि आवाक्याबाहेरची आरोग्य सेवा. गरिबी आणि बेरोजगार युवकांची प्रचंड वाढत जाणारी संख्या. आर्थिक, शैक्षणिक, व मूलभूत सोयीसुविधा नसलेले व यात पिळला जाणारा सर्वसामान्य तरुण. भाजप-आरएसएसकडून दलित, बहुजनांवर केली जाणारी दडपशाही, त्यांचे शोषण. याबद्दल जरा स्वतःलाच विचारुया की, आपल्याला ह्या वास्तवाबद्दल अभिमान आहे का ? कोणते रॉकेट आपल्याला विद्वेष, जातीयवाद आणि मृत्यूपासून दूर नेणार आहे? असा भेदक सवाल करून त्यांनी देशातील जात, वर्ग व्यवस्थेवर बोट ठेवले आहे.
What @isro and #Chandrayaan3 have accomplished are applaudable and has indeed made the nation proud.
But how can WE live with the fact that our nation, which has been to the moon and back, has —
• Shame of the practice of manual scavenging,
• Caste Discrimination and… pic.twitter.com/p9nt7RBBP9— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) August 20, 2023
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– मंडळी! 18001208040 नंबर आताच सेव्ह करा, ‘हे’ दाखले मिळवताना अडचणी आल्यास लगेच फोन करा
– महाराष्ट्रात 31 ऑगस्टला प्रो-गोविंदा स्पर्धा, कशी असेल स्पर्धा? बक्षिसाची रक्कम किती? स्पर्धेचे नियम काय? जाणून घ्या सविस्तर
– रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतन शाळेतील विद्यार्थिनींना डॉ. विनया केसकर यांचे अनमोल मार्गदर्शन