गुरुवार (दिनांक 10 नोव्हेंबर) रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुंबई-पुणे मिसिंग लिंक प्रकल्पाच्या कामाची पाहणी करण्यासाठी मावळ दौऱ्यावर आले होते. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्या या मावळ दौऱ्यानिमित्ताने भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळाने तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे यांच्या नेतृत्वात त्यांची भेट घेतली आणि विविध मागण्यांचे निवेदन त्यांना सादर केले. ( BJP Maval Taluka President Ravindra Bhegde Meets Chief Minister Eknath Shinde )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
भारतीय जनता पार्टी मावळ तालुक्याचे अध्यक्ष रविंद्र भेगडे यांनी एकनाथ शिंदे यांचे मावळ दौऱ्यात स्वागत केले. तसेच, भेगडेंनी मुख्यमंत्र्यांना पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प कायमस्वरुपी रद्द करावा, यासाठीचे निवेदन दिले. मागील काही दिवसांपासून पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प सुरू करण्याबाबत पिंपरी चिंचवड आयुक्त कार्यालयाने पाठपुरावा सुरू केल्याचा बातम्या समोर येत आहेत, त्या पार्श्वभूमीवर हा प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करण्यात यावा, अशी मागणी रविंद्र भेगडे यांनी निवेदनाद्वारे एकनाथ शिंदेकडे केली.
अधिक वाचा –
– Video : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक प्रोजेक्टची पाहणी
– मोठी बातमी! शिळींब गावात महिन्याभरात दुसरी मोठी चोरी, लाखोंचा माल लंपास, ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण I Video