तालुक्यातील पवनमावळ भागातील मौजे शिळींब गावात गुरुवार (10 नोव्हेंबर) रोजी पहाटेच्या सुमारास चोरी झाल्याची घटना घडली आहे. महिन्याभरात चोरीची दुसरी मोठी घटना घडल्याने परिसरात खळबळ माजली असून ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ( Theft In Shilimb Village Near Pawanmaval at Maval Taluka )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
शिळींब गावातील रहिवासी संदीप कोंडीबा ढमाले यांचे शिळींब गावाच्या हद्दीत ‘हॉटेल निसर्ग’ नावाचे हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये आणि हॉटेल परिसरात त्यांच्या मालकीच्या असलेल्या अनेक चिज-वस्तू चोरट्यांनी लंपास केल्या आहे. चोरीचा माल पाहता ही एक टोळीच कार्यरत असावी असा संशय व्यक्त होत आहे. गुरुवारी पहाटेच्या सुमारास ही चोरी झाली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. चोरट्यांनी शेडचे नुकसान केले असून हॉटेलमधील अनेक वस्तू लंपास केल्या आहेत. तसेच धारदार शस्त्राने बोरवेलचा पाईप कापून त्यातील मोटारही चोरी केली आहे. एकंदरीत लाखभर रुपयाचे नुकसान झाले असल्याचे संदीप ढमाले यांनी दैनिक मावळशी बोलताना सांगितले.
हेही वाचा – शिळींबमध्ये चोरट्यांनी दुकान फोडलं, गावातल्या मुख्य चौकातील किराणा दुकानातून हजारोंचा माल लंपास
View this post on Instagram
महिन्याभरात दुसरी चोरी…
पवनमावळ या दुर्गम भागातील शिळींब गावात चोरी होण्याची महिन्याभरातील ही दुसरी मोठी घटना आहे. यापूर्वीच शिळींब गावातील शेखर जगताप यांचे मध्यवर्ती चौकात असलेले दुकान चोरट्यांनी फोडले होते. त्यावेळी त्यांनी ग्रामपंचायतीशी संपर्क साधून चौकात सीसीटीव्ही कॅमेराची मागणी केली होती. तर, पोलिसांकडे तक्रार नोंदवली होती. त्यावर कुठलीही कारवाई होताना दिसली नाही, अशात महिन्याभरात ही दुसरी मोठी चोरी झाल्याने ग्रामस्थ चिंतेत आहेत. तसेच आतातरी पोलिस प्रशासन आणि ग्रामपंचायत या विषयांकडे गांभीर्याने पाहणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.
अधिक वाचा –
– पीएमपीएमएल बस शिळींब गावापर्यंत येणार? विद्यार्थ्यांसह नागरिकांची गैरसोय टळणार? महाव्यवस्थापकांना ग्रामस्थांचे निवेदन
– मोठी बातमी! राज्यातील तब्बल 7 हजार 751 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर, थेट जनतेतून सरपंच, वाचा कार्यक्रमपत्रिका