भारतीय जनता पार्टीच्या पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांचे निधन झाले आहे. प्रदीर्घ आजाराने त्यांचे पुण्यात निधन झाले आहे. गेल्या काही महिन्यांपासून मुक्ता टिळक या कर्करोगाशी झूंज देत होत्या. अखेर आज (गुरुवार, 22 डिसेंबर) रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
कसबा मतदार संघाच्या आमदार व माजी महापौर मुक्ता शैलेश टिळक यांचे आज (गुरुवार) दुपारी 3.30 वाजता दुःखद निधन झाले. उद्या सकाळी अंत्यदर्शनासाठी 9 ते 11 केसरी वाडा राहत्याघरी ठेवण्यात येईल. अंत्यविधी वैकुंठ स्मशामभुमी येथे 11 नंतर करण्यात येतील.
https://twitter.com/mohol_murlidhar/status/1605883006358413313?s=20&t=7Gh0oVl7CwWkeeHUbssTpg
https://twitter.com/KaradRameshappa/status/1605881439429468164?s=20&t=w-f-_q4LWpnmHU5_uYJBCw
नगरसेविका, पुण्याच्या महापौर ते कसबा पेठ मतदार संघाच्या आमदार असा मुक्ता टिळक यांचा प्रवास राहिला आहे. राज्यातील सत्तासंघर्षावेळी आजारी असतानाही त्यांनी पक्षासाठी मतदान करण्यासाठी विधानभवानात जाण्याचा निर्णय घेतलेला, तेव्हाचे त्यांचे व्हायरल फोटो पाहून सर्वत्र कौतूक झाले होते. ( BJP MLA Mukta Tilak Passed Away In Pune Due To Cancer )
अधिक वाचा –
– मोठी बातमी! जैन समाजाच्या आक्रमक पवित्र्यापुढे सरकार झुकले, श्री सम्मेद शिखर स्थळाला तीर्थक्षेत्राचा दर्जा कायम
– ‘निधी देणार नसाल तर तसं सांगा, जाहीर सत्कार करतो’, तालुक्यातील विविध मागण्यांसाठी आमदार शेळके आक्रमक – व्हिडिओ