गाव चलो अभियान अंतर्गत लोणावळा शहरातील तुंगार्ली येथे भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशचे सरचिटणीस विक्रांत पाटील आणि मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रविंद्र भेगडे यांनी येथील नागरिकांच्या घरोघरी भेटी देऊन त्यांना मोदी सरकार आणि महायुती सरकारने केलेल्या जनकल्याणकारी योजनांची माहिती देऊन पत्रके वाटप केली. आपल्या स्वप्नातील विकसित भारत घडविण्यासाठी येणाऱ्या काळात आपण सर्वांनी मोदी साहेबांच्या मागे उभे राहून त्यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करावे, असे मत विक्रांत पाटील यांनी व्यक्त केले. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
यावेळी जेष्ठ संघसेवक जोशी काका आणि भारतीय जनता पार्टीच्या जेष्ठ कार्यकर्त्या भालेराव आजी यांच्या घरी भेट देऊन त्यांच्या तब्बेतीची विचारणा करून त्याचे आशीर्वाद घेतले. याप्रसंगी लोणावळा भाजपा शहराध्यक्ष अरुण लाड, सरचिटणीस शुभम मानकामे, सुधीर पारीठे, युवा मोर्चा अध्यक्ष प्रथमेश पाळेकर, गौरी मावकर, गणेश मावकर, हरीलाल बोरकर, विजय इंगुळकर, संतोष जंगले, श्रवण चिकने, संकेत निकुडे, सिद्धेश अंभोरे यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकारी व बूथ कमिटी सदस्य उपस्थित होते.
अधिक वाचा –
– ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा मावळ तालुका युवक काँग्रेसकडून जोरदार निषेध! Maval News
– श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांची निवड बिनविरोध, पाहा नवनिर्वाचित कार्यकारिणी । Talegaon Dabhade
– बीव्हीजी ॲग्रोटेकचे ‘गो से गोमाता’ अभियान; आमदार शेळकेंच्या उपस्थितीत मावळमधील 300 शेतकऱ्यांना ‘रज्जो’ औषधाचे वाटप