ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे, ॲड. असीम सरोदे, विश्वंभरजी चौधरी आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांवर शुक्रवारी (दि. 9) पुण्यात प्राणघातक हल्ला झाला. (Attack on journalist Nikhil Wagle in Pune) यात निखिल वागळे हे बालंबाल बचावले. त्यांच्यावरील या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ मावळ तालुका युवक काँग्रेसच्या वतीने देहूरोड येथे निदर्शने करण्यात आली. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
या वेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस चे सचिव तथा पुणे ग्रामीण प्रभारी चंद्रशेखर जाधव, मावळ तालुका युवक अध्यक्ष राजेश वाघोले, मावळ तालुका उप संख्यक अध्यक्ष गफूर भाई शेख देहूरोड शहर युवक अध्यक्ष मलिक शेख, मावळ तालुका युवक उपाध्यक्ष कौस्तुभ ढमाले, मावळ तालुका युवक उपाध्यक्ष रईस शेख, प्रदेश सोशल मीडिया समन्वयक वसीम शेख, मावळ तालुका युवक सरचिटणीस निनाद हरपुडे, ऋषिकेश येवले, उपाध्यक्ष आसिफ सय्यद, निलेश बोडके, कार्यद्यक्ष हितेशसिंह चहर, रहीम शेख, आदि उपस्थित होते. (Attack on journalist Nikhil Wagle in Pune Maval Taluka Youth Congress protested)
पुण्यातील कार्यक्रमाला पूर्वीपासून होता विरोध –
ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी पुण्यात राष्ट्रसेवा दलाच्या सभागृहात निर्भय बनो कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ते कार्यक्रमाला आले, तेव्हा त्यांच्या गाडीवर भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केला. भाजप कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीच्या काचा फोडल्या. तसेच त्यांच्या गाडीवर शाईफेकदेखील करण्यात आली. या घटनेनंतर महाविकास आघाडीचे कार्यकर्त्यांनी भाजप कार्यकर्त्यांचा विरोध झुगारण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड केली. या हल्ल्यातून निखील वागळे बचावले. ते कार्यक्रमस्थळी दाखल झाले. त्यानंतर त्यांनी कार्यक्रमस्थळी भाषणही केले. परंतू सध्या या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण गरम झाले आहे.
अधिक वाचा –
– मोठी बातमी! पुणे-लोणावळा रेल्वे मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक, पाहा रद्द झालेल्या लोकल गाड्यांची यादी । Mega Block on Pune Lonavala Railway Route
– निगडे शाळेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेराचे कवच! CCTV In School
– वेहेरगाव येथे ‘आयुष्मान कार्ड’साठी नोंदणी शिबिर, 150 नागरिकांनी केली नोंदणी, लाभार्थ्यांना मिळणार 5 लाखांपर्यंत मोफत उपचार!