वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीची स्थापना होऊन 5 वर्षांचा कालावधी पूर्ण होत आहे. हा कालावधी पूर्ण होत असताना ज्यावेळी वडगाव ग्रामपंचायतचे रूपांतर नगरपंचायत मध्ये झाले, त्यावेळी सरपंच नितीन कुडे व उपसरपंच संभाजी म्हाळसकर ह्यांच्या हस्ते नवीन प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन करून कामाला सुरूवात देखील झाली होती. ( BJP Urgent Demand Name Sardar Mahadji Shinde To New Administrative Building Of Vadgaon Nagar Panchayat )
त्यानंतरच्या कालावधी मध्ये नगराध्यक्ष मयूर ढोरे हे प्रथम लोकानियुक्त नगराध्यक्ष झाले. मागील पाच वर्षांत आता वडगाव नगरपंचायतीची इमारत पूर्णत्वास येत आहे. ही इमारत पूर्ण होत असतानाच इमारतीचे नाव काय असावे? ह्यावरुन आता मागण्यांनी जोर धरला असून सध्याच्या नगरपरिषदेतील विरोधी पक्षनेत्या अर्चना म्हाळसकर यांनी मुख्यधिकारी प्रविण निकम यांना याबाबत एक निवेदन दिले आहे.
विरोधी पक्षनेत्या अर्चना म्हाळसकर यांची सीईओंकडे मागणी…
वडगाव नगरपंचायतचे सीईओ प्रविण निकम यांना विरोधी पक्षनेत्या अर्चना म्हाळसकर ह्यांनी दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, वडगाव शहराला स्वतंत्र असा इतिहास आहे. यातही दी ग्रेट मराठा महादजी शिंदे ह्यांचा इतिहास हा वडगाव शहरवासियांसाठी अभिमानास्पद आहे. महादजी शिंदे यांच्या नेतृत्वात मराठा सैन्याने 14 जानेवारी 1779 रोजी वडगाव मावळ इंग्रजाविरुद्धची ऐतिहासिक लढाई जिंकून वडगाव मावळ इतिहासात अजरामर केले, असा हा इतिहास त्यांच्या नेतृत्वाखाली घडविण्यात आला.
अशा श्रीमंत सरदार महादजी शिंदे ह्यांचे नाव आता नव्याने स्थापन करण्यात आलेल्या आणि नव्याने बांधण्यात आलेल्या वडगाव नगरपंचातच्या मुख्य इमारतीस देण्यात यावे, असे निवेदन भाजपच्या सर्व नगरसेवकांच्या वतीने विरोधी पक्षनेत्या अर्चना म्हाळसकर यांनी दिले आहे. श्रीमंत सरदार महादजी शिंदे यांची गौरवगाथा असलेला माहिती आलेखाचा एक स्वतंत्र दिपस्तंभ देखील नव्याने करावा अशी मागणी देखील करण्यात आली आहे.
मुख्याधिकारी यांना सदर मागणीचे निवेदन सादर करताना भाजपाचे नगरसेवक गटनेते दिनेश ढोरे, नगरसेवक किरण म्हाळसकर, दिलीप म्हाळसकर, दीपाली मोरे, रविंद्र म्हाळसकर आदी जणांनी सही करून हे निवेदन दिले. श्रीमंत सरदार महादजी शिंदे ह्यांचे नाव नगरपंचायत इमारतीस दिल्याने त्यांच्या पराक्रमाची शौर्यगाथा पिढ्यानपिढे पुढे चालू राहिल, हीच यामागील मुख्य धारणा आहे, असे भाजपाकडून सांगण्यात आले आहे. ( BJP Urgent Demand Name Sardar Mahadji Shinde To New Administrative Building Of Vadgaon Nagar Panchayat )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– श्री देवदर्शन यात्रा समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या बाल वारकरी वेशभूषा संमेलन ऑनलाईन स्पर्धेची पारितोषिके प्रदान
– ‘तळेगाव नगरपरिषदेच्या कचरा कॉन्ट्रॅक्ट बाबत चौकशीचे आदेश द्या, अन्यथा आंदोलन करू…’, वाचा काय आहे प्रकरण
– माळेगाव खुर्द येथील सेवाधाम ट्रस्ट आश्रम शाळेतील मुलांना ‘होप फॉर द चिल्ड्रेन फाउंडेशन’कडून मोठी मदत