मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर ग्रॅन्टी बसविण्यासाठी आज (दि. 8 नोव्हेंबर) पुन्हा एकदा ब्लॉक घेतला जाणार आहे. यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर हायवे ट्रॅफीक मॅनेजमेंट सिस्टम अंतर्गत मुंबई व पुणे वाहिनीवर ढेकू गाव कि.मी 37/00 इथे गॅन्ट्री उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत सुरू आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
त्यामुळे आज बुधवार, दिनांक 8 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 ते 2.30 या वेळेत पुण्याहून मुंबईकडे जाणारी आणि दुपारी 2.30 ते 3.00 या वेळेत मुंबईहून पुण्याकडे येणारी वाहतूक पूर्णत: बंद राहणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने दिली आहे. काम पुर्ण झाल्यावर दुपारी 2.30 वाजता पुण्याहून मुंबईकडे जाणारी आणि दुपारी 3.00 वाजता मुंबईहून पुण्याकडे येणारी वाहतूक पुन्हा सुरु करण्यात येईल, असेही कळविण्यात आले आहे. ( block for installation of grantee near dheku on mumbai pune expressway )
अधिक वाचा –
– मावळात 21 पैकी 13 ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचे सरपंच! भाजप-राष्ट्रवादी दोघांचाही दावा असलेले 2 सरपंच कोणते? वाचा
– एचटूओ (H2O) फाउंडेशनमार्फत माळेगाव खुर्द परिसरातील गावांत दिव्यांग आणि गरजूंना दिवाळी भेट!
– कुणाची दिवाळी, कुणाचं दिवाळं! मावळातील 29 ग्रामपंचायतींचा अंतिम, अचूक आणि सविस्तर निकाल, वाचा एका क्लिकवर