मावळचे आमदार सुनिल शेळके यांच्या तळेगाव येथील जनसंपर्क कार्यालयात आज (दि. 7 नोव्हेंबर) तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंच आणि सदस्य यांचा सत्कार समारंभ पार पडला. यावेळी 16 ग्रामपंचायतीचे सरपंच आमदार शेळकेंच्या कार्यालयात उपस्थित होते, अशी माहिती आमदार महोदय यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
“आपल्या मावळ तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच, सदस्य यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन करतो. मतदार राजाने टाकलेला विश्वास सार्थकी लावून ग्रामविकासासाठी आपण सदैव प्रयत्नशील रहाल, ही आशा बाळगून सर्व गावकारभाऱ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो. तसेच या निवडणुकीतील विजयासाठी प्रचंड परिश्रम घेतलेले पदाधिकारी व कार्यकर्ते यांचेही मनःपूर्वक आभार मानतो.” – सुनिल शेळके (आमदार)
- आमदार शेळके आणि राष्ट्रवादी पक्षाने दावा केलेले 13 ग्रामपंचायतीचे सरपंच –
1. दिवड – गणेश खंडू राजीवडे
2. मळवंडी ढोरे – गोरक काशिनाथ ढोरे
3. सुदवडी – सुमित शिवाजी कराळे
4. सुदुंबरे – मंगल कालिदास गाडे
5. कल्हाट – शिवाजी तानाजी करवंदे
6. भाजे – प्रिया अमित ओव्हाळ
7. मुंढावरे – राणी सन्नी जाधव
8. उदेवाडी – नेहा अक्षय उंबरे
9. कोंडिवडे (अं.मा.) – राधा विश्वनाथ मुठारकर
10. सांगिसे – सुनिता योगेश शिंदे
11. लोहगड – सोनाली सोमनाथ बैकर (सार्वत्रिक निवडणूक – बिनविरोध)
12. बेबडओहळ – तेजल राकेश घारे (सार्वत्रिक निवडणूक – बिनविरोध)
13. शिरगाव – पल्लवी प्रविण गोपाळे (पोटनिवडणूक – बिनविरोध)
- आमदार शेळके आणि राष्ट्रवादी पक्षानुसार तालुक्यात भाजपाकडे असलेले सरपंच –
1. साळुंब्रे – विशाल रामराव राक्षे
2. डोणे – ऋषिकेश कोंडीबा कारके
3. आंबळे – आशा संपत कदम
4. शिळींब – सिद्धांत चंद्रकांत कडू
5. जांबवडे – तानाजी बंडू नाटक
6. आढले बुद्रुक – सुवर्णा बाळू घोटकुले (सार्वत्रिक निवडणूक – बिनविरोध)
7. ओव्हळे – दिलीप ज्ञानेश्वर शिंदे (सार्वत्रिक निवडणूक – बिनविरोध)
8. पुसाणे – अमोल ज्ञानेश्वर वाजे (पोटनिवडणूक – बिनविरोध)
कोणत्या ग्रामपंचायतीच्या सरपंचावर राष्ट्रवादी आणि भाजपा या दोन्ही पक्षांचा दावा?
1. उदेवाडी – नेहा अक्षय उंबरे (सार्वत्रिक निवडणूक – विजयी)
2. लोहगड – सोनाली सोमनाथ बैकर (सार्वत्रिक निवडणूक – बिनविरोध)
( Maval Taluka Gram Panchayat Election Results 2023 Final Updates NCP Sarpanch In 13 Villages )
अधिक वाचा –
– गुलाल कुणी उधळला? एका क्लिकवर पाहा मावळातील निवडून आलेल्या आणि बिनविरोध निवडलेल्या 21 सरपंचांची यादी
– मावळ तालुक्यात भाजपाची सरशी! 10 ग्रामपंचायतींवर भाजपाचे ‘कारभारी’, गटातटाच्या राजकारणाचा राष्ट्रवादीला फटका
– ग्रामपंचायत निवडणूक निकाल 2023 : ग्रामपंचायत सुदुंबरे : वाचा अंतिम निकाल, पाहा विजयी उमेदवारांची यादी