भाजपाचे मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रविंद्र भेगडे, तालुकाध्यक्ष भाऊसाहेब गुंड आणि माजी राज्यमंत्री बाळा भाऊ भेगडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मावळ तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीला घवघवीत यश मिळाल्याचे दिसत आहे. सरपंच पदाच्या सार्वत्रिक आणि सरपंच पदासाठीच्या पोटनिवडणूकां मिळून झालेल्या एकूण 21 ग्रामपंचायतींपैकी 10 ग्रामपंचायतींवर भाजपाचे सरपंच निवडून आले आहेत. यासह या दहाही ग्रामपंचायतींवर भाजपाचीच सत्ता आल्याचे प्रथम दर्शनी दिसत आहे. भाजपा पदाधिकाऱ्यांनी हि माहिती दिली. ( Maval Taluka Gram Panchayat Election Results 2023 Final Updates BJP Sarpanch In 10 Villages )
रविंद्र भेगडे यांची पक्षाच्या मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख पदी आणि दत्तात्रय गुंड यांची पक्षाच्या तालुका अध्यक्षपदी निवड झाल्यानंतरची ही पहिलीच सार्वत्रिक निवडणूक होती. तसेच महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या अनेक ग्रामपंचायतींवर जनतेने भारतीय जनता पार्टीच्या शिलेदारांना गावचा कारभार करण्याची संधी दिल्याचे निवडणूक निकालातून दिसत आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
साळुंब्रे ग्रामपंचायत सरपंच पदी विशाल शामराव राक्षे, आढले बू – सुवर्णा बाळासाहेब घोटकुले, ओव्हळे – दिलीप ज्ञानेश्वर शिंदे, डोणे – ऋषीकेश कोंडीबा कारके, लोहगड – सोनाली प्रमोद बैकर, आंबळे – आशा संपत कदम, उदेवाडी – नेहा अक्षय उंबरे, शिळींब – सिद्धार्थ चंद्रकांत कडू, जांबवडे – तानाजी बंडू नाटक तर पुसाणे ग्रामपंचायतच्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे अमोल ज्ञानेश्वर वाजे यांची निवड झाली आहे. हे सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असून जनतेने भाजपाच्या उमेदवाराला गावचा कारभार करण्यासाठी निवडून दिल्याचे रविंद्र भेगडे यांनी माध्यमांना सांगितले.
“आगामी काळात होणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मावळ लोकसभा आणि मावळ विधानसभेवर भारतीय जनता पार्टीचाच उमेदवार विजयी होणार असून आजचा निकाल हा त्याचीच नांदी आहे” – रविंद्र भेगडे (भाजपा विधानसभा निवडणूक प्रमुख – मावळ)
अधिक वाचा –
– ग्रामपंचायत निवडणूक निकाल 2023 : ग्रामपंचायत सुदुंबरे : वाचा अंतिम निकाल, पाहा विजयी उमेदवारांची यादी
– ग्रामपंचायत निवडणूक निकाल 2023 : ग्रामपंचायत कोंडिवडे (आं.मा.) : वाचा अंतिम निकाल, पाहा विजयी उमेदवारांची यादी
– ग्रामपंचायत निवडणूक निकाल 2023 : ग्रामपंचायत डोणे : वाचा अंतिम निकाल, पाहा विजयी उमेदवारांची यादी