यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर हायवे ट्रॅफीक मॅनेजमेंट सिस्टीम अंतर्गत मुंबई वाहिनीवर ओझर्डे ट्रॉमाकेअर केंद्राजवळ कि.मी 79/000 येथे गॅन्ट्री उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत दिनांक 14 डिसेंबर रोजी दुपारी 12 ते 2 या वेळेत करण्यात येणार आहे. ( block for installation of grantee near ozarde village on mumbai pune expressway ) या कालावधीत मुंबई वाहिनीवरील सर्व प्रकारची अवजड वाहतूक तसेच छोटी वाहने (कार) किवळे ब्रिजवरुन जुना महामार्गाने वळविण्यात येणार आहेत. पुणे ते मुंबई जुन्या महामार्गावरील येणारी सर्व प्रकारची वाहने कुसगाव टोलनाका येथून एक्सप्रेस हायवेवर मुंबई मुंबईकडे मार्गस्थ करण्यात येतील, असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने कळविले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– धक्कादायक! खोपोली पोलिसांकडून 218 कोटीपेक्षा अधिक किमतीचे 174.5 किलो अं’मली पदार्थ जप्त
– काले विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या संचालक पदी कविता कालेकर आणि नामदेव कालेकर बिनविरोध
– दैनिक मावळचा अंदाज ठरला खरा! मावळ तालुक्याला मिळाले मोठे गिफ्ट, ग्लास स्कायवॉक प्रकल्पासाठी तब्बल 333 कोटींचा निधी