राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार शरद पवार यांचा दिनांक 12 डिसेंबर रोजी वाढदिवस असतो. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे समर्थक – कार्यकर्ते दरवर्षी अनेक समाजपयोगी उपक्रम राबवत असतात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फुट पडल्यानंतर प्रथमच शरद पवार यांचा वाढदिवस साजरा होत आहे. अशात त्यांचे खंदे समर्थक असलेले कार्यकर्ते साहेबांचा वाढदिवस जल्लोषात साजरा करण्यासाठी झटत आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
मावळ तालुक्यात राष्ट्रवादीतील फुटीनंतर याच महिन्यात अधिकृतरित्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा शरद पवार गट समोर आला. त्यामुळे शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून काही कार्यक्रम राबवले जातील, याची अपेक्षा होती. त्यानुसार राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष अतुल राऊत, तसेच युवक तालुका अध्यक्ष विशाल वहिले यांच्या पुढाकारातून आणि पक्षाकडून वडगाव मावळ शहरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ( blood donation camp in vadgaon maval city on occasion of sharad pawar birthday 12th december )
‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन, गुरूवार दिनांक 14/ डिसेंबर 2023 रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत, ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिर प्रांगण – वडगाव मावळ याठिकाणी करण्यात आले आहे. गरवारे रक्त संकलन केंद्र, तळेगाव दाभाडे यांच्या सहकार्याने हे रक्तदान शिबिर होणार आहे. तसेच प्रत्येक रक्तदात्यास 8 GB पेनड्राईव्ह मोफत देण्यात येणार आहे’, अशी माहिती मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) यांच्याकडून देण्यात आली आहे.
अधिक वाचा –
– मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मंगळवारी पुन्हा ब्लॉक; पाहा कुठे आणि किती वाजता असेल ब्लॉक
– वीज बिलावरील नाव बदलायचंय? अधिकारी – वायरमन अनावश्यक पैसे मागतायेत? ‘या’ नंबरवर करा तक्रार, लगेच होईल कार्यवाही
– मावळमधील शिवणे गावात विकसित भारत संकल्प यात्रेचे स्वागत; लाभार्थ्यांना आयुष्यमान भारत कार्डचे वाटप