Talegaon Dabhade : सत्पात्री दान करणारे तथा सामाजिक समरसता निर्माण केलेले एक अनोखे जाणते कुटुंब म्हणजे श्री व सौ. नायडू… वन्यजीव रक्षक मावळ संस्थेची महत्वाची अडचण दूर करण्यासाठी मोठ्या मोलाची भेट निरपेक्ष भूमिकेतून रमाकांत नायडू व त्यांच्या सौभाग्यवती इंद्रायणी नायडू यांनी दिली. भेट म्हणजे मोठी किंमती तसेंच वन्यजीव रक्षक संस्थेच्या सर्व समाजप्रेमी मंडळींचा वेग वाढविणारी अर्थात बोटीचे सुझुकी कंपनीचे इंजिन ही होय… निलेश गराडे व त्यांच्या सहकारी मंडळींनी जी समाजसेवा केली तीच अखंडित व अविरत गतिशील राहो यासाठी ही भेट दिली गेली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
सदर कार्यक्रमाचे नियोजन जागरूक वाचक कट्टा यांनी केले होते. या कट्ट्याचे कुटुंब प्रमुख गणेश बोरुडे हे कायम समाजाभिमुख राहून त्यांच्या मदतीला धवणारे व्यक्तिमत्व. तसेंच त्यांच्या सोबत दिलीप डोळस व सर्व सहकारी. या सर्वांनी मिळून कार्यक्रम एकदम उंचीवर नेऊन ठेवला. मनःपूर्वक सांगावे वाटते की अनेक मंडळी म्हणतात काय वोट्सअप वर वेळ घालवतोय किंवा काय फायदा या मेडिया वा गॅझेटचा ? मात्र काल खरेच हे जाणवले की प्रत्येक गोष्टीत सकारात्मक बाजू असते मात्र ती शोधावी लागते. पंडित सुरेश सखोलकर आणी डॉ. अनंत परांजपे यांसारिखे धुरीन मंडळी देखील या सोहळ्यास उपस्थित झाली हे खूप बरे झाले. ( Boat engine Gift to Vanyajiv Rakshak Maval Santha Talegaon Dabhade )
एखादा समाज प्रगल्भ कसा म्हणावा याचे उत्तर काल झालेल्या या सोहळ्यात दिसून येते. सर्वांनी आपापल्या परीने या सोहळ्याच्या यशस्वितेसाठी प्रयत्न केले तसेंच पोलीस प्रशासनाने देखील त्यांचे अनुभव व संभाव्य अडचणी सांगितल्या. बहुसंख्येने पत्रकार बंधू-भगिनी देखील उपस्थित असल्याने या दानशूर व्यक्तिमत्वाकडून अन्य कित्येक श्रीमंत मंडळींनी खूप काही शिकण्यासारखे आहे हे देखील येथे अधोरेखित झाले.
‘निलेशभाऊ, माळी मामा, जिगर सोलंकी, निनाद काकडे, शुभम काकडे, गणेश निसाळ, सर्जेस पाटील या सर्वांच्या कामाचे कौतुक – आभार कायम होत राहील कारण अडल्या नडल्या मंडळीना फक्त हिच हक्काची माणसे असतात. मात्र यांच्या मागे यांचे कुटुंब अर्थात सर्वांच्या पत्नी यांचे विशेष कौतुक व धन्यवाद द्यावे असे मला वाटते. निलेशभाऊंच्या मागे खंबीरपणे नेहाताई उभ्या आहेत. तसेंच सर्व या वरील मंडळींच्या मागे त्यांच्या पत्नी जे त्यांना सहकार्य करीत आहेत ते लाख मोलाचें आहे.’ – डॉ. प्रमोद बोराडे, तळेगाव दाभाडे
अधिक वाचा –
– अखेर प्रशासनाच्या दिरंगाईने एक बळी घेतलाच ! कार्ला-मळवली दरम्यानच्या पर्यायी पुलावरून एकजण इंद्रायणी नदीत वाहून गेला । Karla Malavli Bridge
– मुंबई – पुणे एक्सप्रेस वेवर तीन वाहनांचा भीषण अपघात, चालकाचा जागीच मृत्यू, एकाचे पलायन । Accident on Mumbai Pune Expressway
– मोठी बातमी ! पुणे जिल्ह्यातील अनेक पर्यटनस्थळ परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू, मावळ तालुक्यातील ‘या’ ठिकाणांचा समावेश