भारत हा क्रिकेटमध्ये विश्वगुरू आहे. हे आपल्या टी-20 विश्वचषक विजेत्या संघाने सिद्ध केले आहे. पराभवाच्या छायेतून विजय खेचून आणून, कर्णधार रोहित शर्मा आणि त्याच्या संघाने भारतीयांची छाती अभिमानाने फुलून यावी अशी कामगिरी केली आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विश्वविजेत्या भारतीय संघावर कौतुकाची उधळण केली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
टी-20 विश्वचषक विजेत्या संघाचा कर्णधार रोहित शर्मासह, त्याचे सहकारी सुर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल, शिवम दुबे, प्रशिक्षक पारस म्हाब्रे, संघ व्यवस्थापक अरूण कानडे यांचा शुक्रवारी (दि. 5 जुलै) विधानभवनातील मध्यवर्ती सभागृहात विशेष सत्कार करण्यात आला. ( Rohit Sharma Suryakumar Yadav Yashasvi Jaiswal Shivam Dubey felicitated by Maharashtra Government 11 crore prize to Team India )
भारतीय संघासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने अकरा कोटी रुपयांचे विशेष पारितोषिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. मुंबई महानगर प्रदेशात भविष्यात भव्य आणि आधुनिक असे स्टेडियम उभारण्यास गती देण्यात येईल, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
कर्णधार म्हणून रोहित यांनी संघातील सहकाऱ्यांचा जिंकलेला विश्वास हा महत्त्वाचा आहे. त्यांची नेतृत्वशैली ही भारतीय संघाच्या कर्णधाराची परंपरा राखणारी आहे. मुंबईकर हे सर्व खेळाडू महाराष्ट्राचा अभिमान असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तर, विधानभवनात असा दिमाखदार समारंभ होतो आहे, याचे मोठे समाधान आहे. सूर्यकुमार यांचा झेल हा अप्रतिमच होता. यापुढे रोहित टी-20 खेळणार नाही. पण यापुढे ज्या-ज्यावेळी आपण टी-20 पाहू, त्यावेळी रोहितची आठवण आल्याशिवाय राहणार नाही असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
या विशेष समारंभास विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहातील सदस्य, क्रीडाप्रेमी आदी उपस्थित होते.
अधिक वाचा –
– शाब्बास ! तळेगावचा ‘श्रीरूप जगताप’ शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात दुसरा, कौतूकाचा होतोय वर्षाव । Talegaon Dabhade
– अखेर प्रशासनाच्या दिरंगाईने एक बळी घेतलाच ! कार्ला-मळवली दरम्यानच्या पर्यायी पुलावरून एकजण इंद्रायणी नदीत वाहून गेला । Karla Malavli Bridge
– मुंबई – पुणे एक्सप्रेस वेवर तीन वाहनांचा भीषण अपघात, चालकाचा जागीच मृत्यू, एकाचे पलायन । Accident on Mumbai Pune Expressway