Dainik Maval News : पवन मावळ विभागातील अतिदुर्गम अशा बोडशीळ गावातील शाळेत ज्ञानदानाचे कार्य करीत असताना शाळेच्या भौतिक सुविधेत भर टाकण्यात व विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासात मोलाचे योगदान देणारे आदर्श शिक्षक, मुख्याध्यापक अंकुश येवले यांना वाघजाई माता मंडळ, बोडशीळ ग्रामस्थांकडून आदर्श शिक्षक ग्रामगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
पवन मावळातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येवलेवाडी (शिवली) येथील मुख्याध्यापक अंकुश लक्ष्मण येवले यांना तात्पुरत्या समायोजनाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बोडशीळ येथे पाठविण्यात आले होते. अंकुश येवले येथे दोन वर्ष कार्यरत होते. पवन मावळातील अतिदुर्गम भाग असणारे हे ठिकाण महिला शिक्षिकांसाठी सोयीचे नसल्याने गटशिक्षणाधिकारी सुदाम वाळुंज यांनी येवले यांना बोडशीळ येथे नियुक्त केले होते.
- बोडशीळ गावात नियुक्त झाल्यानंतर याठिकाणी शाळेत मुलांना शिकवित असताना विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसोबतच शाळेच्या भौतिक सुविधाही वाढविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. शाळेच्या नवीन इमारतीसाठी 14 लाख रुपयांचा इमारत निधी मंजूर करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यासाठी गावकऱ्यांच्या मदतीने जिल्हा नियोजन समिती व आमदार सुनील शेळके यांच्याकडे पाठपुरावा केला.
बोडशीळ ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समिती यांनी अंकुश येवले यांच्या कार्याची दखल घेत त्यांना ‘ग्रामगौरव पुरस्कार’ देऊन गौरविले आहे. गावातील कार्यक्रमात विद्यमान ग्रामपंचायत सदस्य प्रवीण चोरघे, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, ग्रामस्थ यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
- याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा रेणूका ठोंबरे, सुनिता ठोंबरे, लता चोरघे, सीमा चोरघे, हरीष चोरघे, दिनेश चोरगे, श्यामराव चोरघे, किरण चोरघे, अभिषेक चोरघे आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. व महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण चोरघे यांनी केले, आभार दिनेश चोरघे यांनी मानले.
सत्काराला उत्तर देताना अंकूश येवले म्हणाले, ग्रामीण भागामध्ये शिक्षणाची ज्ञानगंगा पोहोचवित असताना ग्रामस्थांनी शिक्षकांचा गौरव करणे म्हणजे त्यांच्या कामाला दिलेले एक मोठे प्रोत्साहन ठरेल. ग्रामस्थ शिक्षकांच्या पाठीशी उभे असेल तर शाळेचा भौतिक आणि शैक्षणिक विकास करण्यात काहीच अडचण येणार नाही. ग्रामस्थ सदैव माझ्या पाठीशी उभे राहिल्यामुळे मी हे काम साध्य करू शकलो.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत महाराष्ट्रातील 132 रेल्वे स्थानकांचा होणार कायापालट ; पाहा रेल्वे स्थानकांची यादी व मंजूर निधी
– सोमाटणे फाटा येथील कोंडी सोडविण्यासाठी पीएमआरडीएच्या जागेत रस्त्यांचे रुंदीकरण करावे – खासदार श्रीरंग बारणे
– ना दाखला ना कुठली सेवा मिळणार ; थकबाकीदारांवर वडगाव नगरपंचायत करणार कठोर कारवाई । Vadgaon Maval