वडगाव मावळ रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर गुरुवारी (10 नोव्हेंबर) रोजी रात्री एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. सदर मृत तरुणाचे अंदाजे (वय 30) असून उंची 5 फूट 5 इंच आहे. रंगाने गोरा, अंगाने सडपातळ, नाक सरळ, डोक्याची केस काळे आणि वाढलेले, दाढी-मिशी काळी वाढलेली असे मृताचे वर्णन आहे. ( Body Of An Unknown Youth Was Found At Vadgaon Maval Railway Station )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
सदर मृत तरुणाच्या अंगामध्ये पिवळ्या रंगाचा फूल शर्ट आणि मिलिटरी निळ्या रंगाची ट्रॅक पॅन्ट, पायात पिवळ्या रंगाची चप्पल असा पेहराव आहे. उजव्या हातावर श्रीमंत योगी आणि पंजावर ओम साई राम असे मराठीत गोंदलेले दिसत आहे. या तरुणाचा जुनाट अंगरोगाने मृत्यू झाला असावा, अशी शक्यता रेल्वे पोलिसांनी व्यक्त केली. मृताविषयी माहिती असल्यास तळेगाव रेल्वे पोलीस हवालदार वसंत कुटे ( 9923385898 )यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
अधिक वाचा –
– व्हिडिओ : जेव्हा शरद पवार डॉक्टरांना म्हणाले, ‘तुम्हाला पोहोचवल्यावरच मी जाणार..’, अजित पवारांनी सांगितला तो किस्सा
– व्हिडिओ: अजित पवारांनी स्वतः सांगितलं 7 दिवस गायब होण्यापाठीमागचं कारण, सर्वांचेच गैरसमज केले दूर