Dainik Maval News : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच जाहीर होतील. त्याची पूर्व तयारी म्हणून आरक्षण सोडत जाहीर झाली असून मतदार यादी कार्यक्रम जाहीर झाला आहे. मावळ तालुक्यात देखील जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका तसेच वडगाव मावळ नगरपंचायत निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे.
याच दरम्यान लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदार यादीतील बोगस मतदारांचा घोळ कायम असल्याची तक्रार पुन्हा एकदा पुढे आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मावळ तालुका आणि शिवसेना परिवार मावळ यांच्या वतीने या संदर्भात शासनाकडे आक्षेप नोंदवून, आंदोलन करून व निवेदन देण्यात आले आहे.
वडगाव येथे या पार्श्वभूमीवर मावळ तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीपूर्वी मतदार यादीतील घोळ व बोगस मतदारांची तपासणी करून ती दुरुस्त करण्यात यावी. अन्यथा या निवडणुका रद्द कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. शासनाने या बाबतीत योग्य निर्णय न घेतल्यास शिवसेनेतर्फे तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे. यावेळी अनिल ओव्हाळ, प्रमोद भालेराव आदी पदाधिकारी उपस्थित होते.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणूक : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मागविले इच्छुक उमेदवारांचे अर्ज
– ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियानाचा तिसरा टप्पा ३ नोव्हेंबरपासून – वाचा सविस्तर
– जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली, पोलीस अधीक्षकांच्या सुचनाही नजरेआड ; लोणावळा शहरात अवजड वाहनांची वाहतूक सुरूच