Dainik Maval News : श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या 27 व्या गाळप हंगामाचा बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ शुक्रवारी (दि. 18) अतिशय उत्साहाने आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये साजरा करण्यात आला. भागवताचार्य हभप चंद्रकांत महाराज वांजळे आणि त्यांच्या पत्नी वैशाली चंद्रकांत वांजळे यांच्या हस्ते हा समारंभ संपन्न झाला.
यावेळी श्रीक्षेत्र देहू संस्थानचे हभप पुरुषोत्तम महाराज मोरे (इनामदार) तसेच कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब नवले आणि संचालक मंडळ, कार्यकारी संचालक, शेतकरी, अधिकारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. मुळशी, मावळ, खेड, हवेली, शिरूर असे 5 तालुक्याचे कार्यक्षेत्र असलेल्या या कारखान्याकडून यावर्षी पाच लाख मेट्रीक टन ऊस गाळप होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली.
कार्यक्रमास माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे, आत्माराम कलाटे, अनिल लोखंडे, चेतन भुजबळ, दिलीप दगडे, शिवाजी पवार, सुभाष राक्षे, शामराव राक्षे, सखाराम गायकवाड, शुभांगी गायकवाड, ताराबाई सोनवणे, कारखान्याचे वरिष्ठ अधिकारी मोहन काळोखे, रणजीत सिंह जगदाळे, सुरेश सस्ते, संतोष दाभाडे, स्वप्नील गावडे, हिरामण गोपाळे यांच्यासह शेतकरी आणि कारखान्यातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कारखान्याचे कार्यकारी संचालक साहेबराव पठारे आणि मोहन काळोखे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते. यावर्षी कारखान्याच्या कार्यक्षेत्रात 5 हजार 870 हेक्टर क्षेत्रावर ऊस लागवड झालेली असून या उसापासून यावर्षी कारखान्यातून पाच लाख टन ऊस गाळप होईल असा अंदाज साहेबराव पठारे यांनी व्यक्त केला आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– कामशेत बोगद्याजवळ टेम्पो उलटून अपघात, एकाचा जागीच मृत्यू
– केटीएसपी मंडळाच्या नव्या विधी महाविद्यालयाची खोपोली शहरात सुरुवात । Khopoli News
– लोणावळ्यात संत तुकाराम साखर कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात साखर वाटप । Lonavala News