मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर मंगळवारी (दिनांक 4 जुलै) रोजी मध्यरात्री 11:30 वाजताच्या सुमारास शिवनेरी बस आणि ट्रकचा अपघात झाला. प्राप्त माहितीनुसार, मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मुंबई लेनवर कि.मी. 37.00 जवळ हा अपघात झाला, ज्यात शिवनेरी बसने (क्र. MH 12 VF 3924) ट्रकला (क्र. MH 10 DT 4293) पाठी मागून धडक दिली.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
शिवनेरी बस चालक विकास लाड (वय 40 वर्षे, रा.पुणे) हा स्वारगेट ते ठाणे या बस मधून 06 प्रवाशांसह एक्सप्रेस वे वर प्रवास करत असताना त्याचे किलोमीटर 37.00 च्या दरम्यान उतारावर बस वरील नियंत्रण सुटल्याने तिसऱ्या लेनमधून चालणाऱ्या ट्रकला मागून जोरदार धडक दिली. या धडकेमुळे बसची केबिन दबल्याने बस चालक आत अडकला होता. ( Braking News Shivneri bus and truck accident at midnight on Mumbai Pune Expressway )
आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, महामार्ग वाहतूक पोलीस यंत्रणा बोरघाट, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठीच्या टीम मेंबर्सनी त्याला कसोशीने प्रयत्न करून बाहेर काढले. त्याच्या पायाला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने उपचाराकरिता लोकमान्य हॉस्पिटलच्या ॲम्बुलन्स मधून एमजीएम हॉस्पिटल कामोठे येथे रवाना केले आहे.
तसेच बस मधील इतर 06 प्रवाशांना किरकोळ दुखापत झाल्याने उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालय खोपोली नगरपालिका रुग्णालयात पाठविण्यात आले. अपघातग्रस्त वाहने बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत केली. सदर अपघात खोपोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत झाला असल्याने पोलीस निरीक्षक शितल कुमार राऊत हे अधिक तपास करत आहेत.
अधिक वाचा –
– लोणावळा ग्रामीण पोलिस हद्दीतील कार्ला ते लोहगड मार्गाची IPS सत्यसाई कार्तिक यांच्याकडून पाहणी; वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अनेक उपाययोजना
– पावसाळ्यात फिरायला जायचंय? पुणे जिल्ह्यातील मावळ तालुका म्हणजे पावसाळ्यात स्वर्गच, ‘या’ ठिकाणांना नक्की भेट द्या