पुणे मुंबई यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर आज (सोमवार, दिनांक 3 एप्रिल) रोजी पहाटे पाचच्या सुमारास एक भीषण अपघात झाला. मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर ट्रक (क्रमांक UP- 64 AT-2285 ) हा मुंबई लेन वर 40.300 अर्थात आडोशी बोगदा इथे आला असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि अपघात झाला. ( Breaking News Fatal Accident Of Cargo Truck Near Adoshi Tunnel On Mumbai Pune Expressway Near Khopoli )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
ट्रक चालकाला अतिवेगाने असलेला ट्रक कंट्रोल करता आला नाही आणि मुंबई लेनवर सुरक्षा कामी लावलेले बॅरिकेट उडवून त्या ठिकाणी काम करत असलेल्या जेसीबी (क्रमांक MH 43-271) याला त्याने ठोकर मारली. त्यानंतर संरक्षक कठड्याला धडकून मुंबई लेनवरून पुणे लेनवर उलटून पडला.
या अपघातामध्ये ट्रक चालक विनोदकुमार (वय-27 वर्ष) लालबाबू प्रसाद (वय-35 वर्ष) याना गंभीर दुखापती झाल्या. क्लीनर दिपककुमार पांडे आणि रस्त्यावर काम करणारे कामगार समीर पालांडे आणि शंकर मंडळ हे देखील किरकोळ जखमी झाले. सर्वांना उपचारासाठी एमजीएम रुग्णालय कामोठे इथे पाठविण्यात आले.
हेही वाचा – तळेगाव दाभाडे येथील लिंब फाट्यावर अपघात प्रतिबंधक उपाययोजना म्हणून सेफ्टी बॅरिअर आणि चॅनेलायझर
अपघात झाल्यानंतर ट्रक मधील वजनी साहित्य बाहेर विखुरले गेल्याने काही वेळ वाहतूक बाधित झाली होती. बोरघाट वाहतूक पोलीस, आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, डेल्टा फोर्स, लोकमान्य आरोग्य यंत्रणेची ॲम्बुलन्स यांनी यावेळी मोलाची मदत केली. हा अपघात खोपोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडला असून पुढील तपास खोपोली पोलिस करत आहेत.
अधिक वाचा –
– अर्ध्या कड्यावर बॉडी आली आणि रोपचा गुंता झाला; लायन्स पॉइंट येथील बॉडी रेस्क्यूचा थरार!! शिवदुर्गच्या अथक प्रयत्नांना सलाम
– मावळवासियांसाठी आनंदवार्ता : वडगाव शहरात पीएमपीएमएल बस पास सेवा केंद्र सुरू