व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, June 14, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

अर्ध्या कड्यावर बॉडी आली आणि रोपचा गुंता झाला; लायन्स पॉइंट येथील बॉडी रेस्क्यूचा थरार!! शिवदुर्गच्या अथक प्रयत्नांना सलाम

दिनांक 31 मार्च 2023 रोजी सकाळी 11.45 वाजता लायन्स पॉईंट, लोणावळा इथून शिवदुर्गला फोन आला होता की, एक व्यक्ती लायन्स पॉइंट इथे दरीत पडला आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 3, 2023
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, शहर
Shivdurg-Team-Lonavala

Photo Courtesy : Sunil Gaikwad Shivdurg


दिनांक 31 मार्च 2023 रोजी सकाळी 11.45 वाजता लायन्स पॉइंट लोणावळा इथून शिवदुर्गला फोन आला होता की, एक व्यक्ती लायन्स पॉइंट इथे दरीत पडला आहे. याबाबत अधिक माहिती घेऊन लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशनलाही कळवण्यात आले. पोलिस निरीक्षक यांनी याला त्वरित प्रतिसाद देत पोलिस पथकासह शिवदुर्ग टीमने घटनास्थळ गाठले. ( Shivdurg Rescue Team Lonavala Lions Point Body Recovery Operation )

Novel NIBR Ads

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

लोणावळा लायन्स पॉईंट रिकवरी ऑपरेशनचा थरार…

शिवदुर्ग रेस्क्यू टीम साहित्यासह घटनास्थळी पोहोचली, तेव्हा एक वाजला होता. शोधकार्यानंतर अर्धा-पाऊण तासात दरीत कोसळेल्या व्यक्तीची बॉडी दिसली. साधारण दोनशे मीटर रॅपलींग केल्यानंतर बॉडी दिसायला लागली त्यानंतर अजून शंभर फुटांपेक्षा जास्त अंतरावर बॉडी होती. त्यामुळे इथे खरा कस लागणार होता.

तोवर इतर तयारी करण्यात आली, खाली बॉडी पॅक करण्यासाठी स्ट्रेचर व इतर साहित्य पाठवण्यात आले. योगेश उंबरे, सुरज वरे यांच्या मदतीला हर्ष तोंडे हा शिवदुर्ग साथी देखील खाली गेला. वरची सर्व जबाबदारी महेश मसने, सचिन गायकवाड यांनी सांभाळली. सेट अप लावला तोवर खाली बॉडी पॅक झाली होती. बॉडी तीव्र उतारावर असल्याने बॉडी पॅकिंगला अडचणी येत होत्या.

Novel NIBR Ads

पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ, पोलिस उपनिरीक्षक भारत भोसले यांच्या सह अनेक पोलिस कर्मचारी यावेळी मदतीला होते. घनदाट जंगल, तीव्र उतार जिथे खऱे तर व्यवस्थित उभे ऱ्हायला देखील जागा नव्हती तिथे रेस्क्यू ऑपरेशन सुरु करण्यात आले. बॉडी खेचण्यात कारवीच्या जंगलामुळे मोठी अडचण येत होती.

खालून वॉकीटॉकीवर कॉल आला आणि बॉडी खेचायला सुरुवात करण्यात आले. शंभर फुट खेचल्यानंतर वर खेचण्यासाठी जड जात होते. अजून जोर लावण्यात आला, जोरात आवाज होऊन रोपचा आवटर फाटला गेला. सेट अप चेंज ओव्हर केला आणि जूमार अजुन पुढे लावले परत ओढायला चालू केले तेव्हा परत जोरात आवाज झाला आणि रोपच तुटला. हा त्या घडीचा अत्यंत कठीण प्रसंग होता.

त्यानंतर आदित्य पिलानेला खाली पाठवले, चेकींग गेले तेव्हा रोप गुंडाळून गेला असल्याचे समजले. सुनिल गायकवाड हे देखील खाली एजपर्यंत जाऊन आले. रोप भयंकर गुंडाळून त्याची गुंडाळी अडकत होती. तो गुंता काढण्याचे आदित्यने प्रयत्न केले आणि गुंता सोडवला. नंतर अथक परिश्रमाने हळूहळू बॉडी वर आली. बॉडी पोलिसांच्या ताब्यात दिली आणि परतीच्या प्रवासासाठी आवराआवर केली.

लायन्स पॉइंट शिवदुर्ग रेस्क्यू टीम

महेश मसने, सचिन गायकवाड, हर्ष तोंडे, योगेश उंबरे, सूरज वरे, योगेश दळवी, हर्षल चौधरी, आदित्य पिलाने, प्रिन्स बेठा, आयुष वर्तक, मधुर मुंगसे,
वैभव राऊळ, राजेंद्र कडू, अशोक उंबरे, गणेश रौंदळ, अमित बलकवडे , सदाशिव सोनार, चंद्रकांत गाडे, अशोक कुटे, हनुमंत भोसले, केतन खांडेभरड, संतोष खोसे, अमोल सुतार, सुनील गायकवाड

मयताचे नाव – खेमा बबन घुटे (वय 39 परली, ता.सुधागड, जिल्हा रायग)
शिवदुर्ग रेस्क्यू हेल्पलाईन नंबर – 9822500884

अधिक वाचा –
– मनसे मावळ तालुका कार्ला-कुरवंडे जिल्हा परिषद गटाची नूतन कार्यकारणी जाहीर; पाहा पदाधिकाऱ्यांची संपूर्ण यादी
– वडगाव फाट्यावरील सिल्वर ट्रेझर सोसायटीच्या परिसरात भीषण आग; आपदा मित्राच्या प्रसंगावधानाने टळला मोठा अपघात


dainik maval jahirat

Previous Post

मनसे मावळ तालुका कार्ला-कुरवंडे जिल्हा परिषद गटाची नूतन कार्यकारणी जाहीर; पाहा पदाधिकाऱ्यांची संपूर्ण यादी

Next Post

शिरगाव सरपंच हत्या प्रकरण : अटक केलेल्या आरोपींवर मोठी कारवाई, वाचा सविस्तर

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Shrigaon-Sarpanch-Murder-Case

शिरगाव सरपंच हत्या प्रकरण : अटक केलेल्या आरोपींवर मोठी कारवाई, वाचा सविस्तर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Talegaon Dabhade Conclusion of Shri Swami Samarth Namjap ceremony held to mark Adhik Maas

तळेगाव दाभाडे : अधिक मासानिमित्त १ कोटी २५ लाख श्री स्वामी समर्थ नामजप सोहळ्याची भक्तिमय वातावरणात सांगता

June 14, 2026
New District Executive Committee of Bharatiya Janata Party BJP Mahila Morcha Pune North District announced

भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा, पुणे उत्तर जिल्ह्याची नूतन जिल्हा कार्यकारिणी जाहीर; कार्यकारिणीत मावळचा दबदबा

June 14, 2026
Women farmers to get distinct identity Women Farmers Empowerment Bill to be tabled during monsoon session

महिला शेतकऱ्यांना मिळणार स्वतंत्र ओळख; राज्याच्या पावसाळी अधिवेशनात सादर होणार ‘महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक’

June 14, 2026
Gutkha manufacturers will be subject to MCOCA in new year said Minister Narhari Zirwal informed

गुटखा व्यवसाय करणाऱ्यांवर आता ‘मकोका’ अंतर्गत कठोर कारवाई होणार ; अन्न व औषध प्रशासनाचे महत्त्वपूर्ण पाऊल

June 14, 2026
Transport vehicles carrying silt from lake should not be obstructed directives from Minister Sanjay Rathod

तलावातील गाळ वाहून नेणाऱ्या वाहतुकीची अडवणूक करू नये; मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे निर्देश

June 14, 2026
Entry ban for heavy vehicles in Lonavala

महत्वाची बातमी ! पुणे शहरात १५ ते २४ जूनदरम्यान जड-अवजड वाहनांच्या प्रवेशास बंदी

June 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.