पवना नदी काठच्या सर्व नागरिकांना पूर नियंत्रण कक्षाकडून महत्वाची सुचना देण्यात आली आहे. पवना धरण परिसरात पावसाचा जोर वाढल्याने हा इशारा देण्यात आला आहे. ( Important notice to citizens living along Pavana river )
काय आहे सुचना?
“पवना नदी काठच्या नागरिकांना सुचित करण्यात येत आहे की पवना धरण 100 टक्के क्षमतेने भरलेले आहे. तरी विज निर्मिती ग्रुहद्वारे पवना नदी मध्ये पिण्यासाठी व सिंचनासाठी सकाळी 9:30 वाजता 800 क्यूसेक्स विसर्ग करण्यात आलेला आहे. सदर विसर्ग 12:00 वाजता वाढवून 800 क्यूसेक्स वरून 1400 क्यूसेक्स करण्यात येणार आहे. तसेच धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण पाहता कधीही पवना धरणाच्या सांडव्यावरून पवना नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू करण्याची दाट शक्यता आहे.
तरी पवना नदी काठच्या सर्व नागरीकांना सूचित करण्यात येते की कृपया नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदी मधील पाण्याचे पंप, नदी काठचे शेती अवजारे व तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत. कृपया सखल भागातील संबंधित नागरिकांना सूचना देण्यात याव्यात व सर्वांनी योग्य ती दक्षता घ्यावी व पाटबंधारे विभागास सहकार्य करावे ही विनंती” अशी सुचना पवना धरण पूरनियंत्रण कक्षाकडून देण्यात आली आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– बहुचर्चित येळसे ग्रामपंचायतच्या सरपंचपदी बायडाबाई कालेकर; 50 वर्षांत पहिल्यांदाच शेवती वसाहतला सरपंचपदाचा मान
– वैकुंठवासी मृदंगमणी दत्तोबा महाराज शेटे यांचे पुण्यस्मरण आणि गुरुपौर्णिमा निमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान
– अजित पवारांकडून ‘एक देश, एक निवडणूक’ पॉलिसीचं समर्थन; म्हणाले ‘पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात…’