गेले दोन दिवस मावळ तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे ओढे, नाले, नद्या दुथडी भरून वाहत आहे. इंद्रायणी नदीला पूर आल्याने इंद्रायणीच्या मार्गातील पूल पाण्याखाली गेले आहेत. अशात आंदर मावळ विभागाला जोडणारा टाकवे बुद्रुक येथील पूल पाण्याखाली गेल्याने तब्बल 40 ते 50 गावांचा संपर्क तुटला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
आंदर मावळ विभागाला जोडणारा कान्हे ते टाकवे दरम्यानचा टाकवे पूल आज (दि. 25 जुलै) सकाळी पाण्याखाली गेला होता. याचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध झाले होते. नवीन पुलाचे काम चालू असल्याने आणि तो पुल वाहतुकीसाठी खुला न झाल्याने नागरिकांना अद्याप जुण्याच पुलावरून दळणवळण करावे लागते, अशात गुरूवारी सकाळी जेव्हा नदीच्या पाण्याची पातळी वाढली, तेव्हा हा पूल पाण्याखाली गेला. ( Bridge over Indrayani river Takwe Budruk went under water Andar Maval Communication Stopped )
आंदर मावळात तब्बल 40 ते 50 गावे आणि अनेक उद्योग व्यवसाय आहे. येथे दररोज ये-जा करणारे सामान्य नागरिक, कामगार यांचा यामुळे खोळंबा झाला. टाकवे औद्योगिक वसाहतीला याचा मोठा फटका बसला. इंद्रायणी नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहत असल्याने आजूबाजूच्या गावाला पुराचा फटका बसल्याचे चित्र पाहायला मिळाले. नदी काठच्या नागरिकांना खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे.
अधिक वाचा –
– पवना धरणावरील जलविद्युत प्रकल्प सुरू ठेवावा, पालकमंत्री अजित पवार यांच्या सुचना । Pavana Dam News
– पवन मावळाला मुसळधार पावसाने झोडपले ! हंगामातील विक्रमी पावसाची नोंद, एका दिवसात पवना धरणात 13 टक्क्यांची वाढ
– मोठी बातमी ! ताम्हिणी घाटात दरड कोसळली, घाट रस्ता बंद, दरड हटविण्याचे काम सुरू । Pune News