Dainik Maval News : पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेमध्ये वडगाव नगरपंचायतीने तीन पदकांची कमाई केली. प्रथमच सांघिक स्पर्धेत क्रिकेट संघातील खेळाडूंनी आपल्या कौशल्याची चुणूक दाखवित द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळविले. बारामती येथे दिनांक ९ ते ११ जानेवारी दरम्यान या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात जिल्ह्यातील एकूण १६ नगरपरिषदा सहभागी झाल्या होत्या.
वडगाव नगर पंचायतीच्या वतीने अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यात सक्रीय सहभाग घेतला होता. प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉ. प्रविण निकम यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी ३ पदके मिळवून चमकदार कामगिरी केली. सांघिक स्पर्धेतील क्रिकेट सामन्यात वडगांव संघाने एकूण १७ संघावर मात करीत अंतिम फेरीपर्यंत मजल मारली व द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले. वैयक्तिक स्पर्धेतील बॅडमिंटन स्पर्धेत द्वितीय क्रमांक व वैयक्तिक नृत्य स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकाविला आहे.
स्पर्धेच्या बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार, जिल्हा सह आयुक्त व्यंकटेश दुर्वास, नगरपरिषद प्रशासन शाखा पुणे विभाग उपायुक्त दत्तात्रय लांघी, सर्व मुख्याधिकारी, स्पर्धेत भाग घेतलेले अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. यावेळी वडगाव नगरपंचायतीस प्राप्त झालेले बक्षीस वितरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील रिंग रोड बाधित शेतकऱ्यांवरील ‘संक्रात’ टळली ; ‘या’ गावांमधील शेतकऱ्यांना मिळाली मुदतवाढ
– मावळ तालुक्यातील पुणे ग्रामीण पोलीस दलाची ठाणी पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाला जोडण्यास विरोध । Maval News
– ‘नियमित व वेळेवर कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान लवकर द्या, अन्यथा आंदोलन करणार’