किवळे देहूरोड येथे एका राहत्या घरात घरफोडी झाल्याची घटना घडली आहे. चोरट्यांनी घरात माणसे नसल्याचा फायदा घेऊन घराचे कुलूप तोडत घरात प्रवेश केला आणि घरातील सोन्या चांदीचे दागिने लंपास केले. प्रसाद सदाशिव जाधव (वय 29) यांनी या प्रकरणी देहूरोड पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. ( Burglary at Kiwale Dehu Road Theft of Gold And Silver Jewellery )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे घरी नसताना अज्ञात चोरट्याने दिनांक 4 फेब्रुव्रारी दु. साडेतीन ते दिनांक 5 फेब्रुवारी सायं. पाऊणे आठच्या दरम्यान फ्लॅट नं १२ वरदविनायक अपार्टमेंट, विकासनगर, किवळे देहुरोड येथील त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला आणि घरातील 71 हजारांचे सोन्याचे दागिने आणि 4 हजाराचे चांदीचे दागिने असा एकूण 75 हजारांचा मुद्देमाल लंपास केला. फिर्यादीच्या तक्रारीवररुन अज्ञात आरोपीविरोधात देहूरोड पोलिसांत भादवि कलम 380, 454, 457 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सपोनि जाधव हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
अधिक वाचा –
– ‘आय लव्ह यू’ लिहित अल्पवयीन तरुणीचे फोटो इन्स्टाग्रामवर टाकणाऱ्या तरुणाविरोधात शिरगाव पोलिसात गुन्हा
– अल्पवयीन मुलीला पळवून नेत तिच्यावर अत्याचार करणाऱ्या आरोपीला लोणावळा येथून अटक