Dainik Maval News : मावळचे आमदार आज मावळ तालुक्याच्या विकासाच्या गप्पा मारत आहेत. प्रत्यक्षात विकासाच्या नावाखाली तालुक्यातील नागरिकांची मोठी फसवणूक केली आहे. एवढा मोठा निधी कुठे गेला, हा संशोधनाचा विषय आहे, असा सवाल उपस्थित करीत बापूसाहेब भेगडे यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी मावळ तालुक्यात प्रचाराचा झंझावात सुरु केला आहे.
मावळ विधानसभा मतदार संघातील सर्वपक्षीय उमेदवार बापूसाहेब भेगडे यांचा प्रचारदौरा सुरू आहे. वेहरगाव येथे एकविरा देवी पायथा मंदिर येथे एकविरा देवीचे दर्शन घेऊन प्रचार दौऱ्याला सुरुवात झाली. वेहरगाव, दहिवली, कार्ला, शिलाटने, टाकवे खुर्द, मुंढावरे (फांगणे वसाहत), मुंढावरे, पाथर, ताजे, पिंपळोली, बोरज आदी ठिकाणी महिलांनी औक्षण करीत बापूसाहेब भेगडे यांचे स्वागत केले.
यावेळी भाजपा महिला आघाडीच्या मावळ अध्यक्ष सायलीताई बोत्रे, भाजप नेते जितेंद्र बोत्रे, भाजपचे मावळ अध्यक्ष दत्तात्रेय गुंड, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद कुटे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष रुपेश म्हाळसकर आदींसह ग्रामस्थ आजी-माजी सरपंच, विविध कार्यकारी सोसायटीचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.
वेहरगाव येथील नागरिकांनी चांगले रस्ते, पिण्याचे शुद्ध पाणी या सुविधांचा अभाव असल्याची तक्रार यावेळी महिलांनी केली. ज्या पाण्यात म्हशी बसतात, ते पाणी आम्हाला पिण्यासाठी वापरावे लागते. फांगणे वसाहत येथील नागरिकांनी सांगितले, पाच वर्षांपूर्वी आमदारांनी पाण्याच्या टाकीचे काम सुरू केले. मात्र, अद्याप टाकीचे काम पूर्ण झालेले नाही. बापूसाहेब भेगडे आमदार झाल्यावर या टाकीचे काम निश्चित पूर्ण करतील, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला.
मावळमधील रस्त्याची समस्या, पाण्याची समस्या सोडविण्यासाठी व मावळचा स्मार्ट विकास करण्यासाठी आम्ही सर्व एकजुटीने तुमच्यासोबत आहोत, असा विश्वास नागरिकांनी यावेळी दिला.
गेल्या ५ वर्षात विकासकांना ब्रेक लावणाऱ्यांना, मावळची अस्मिता पायदळी तुडवणाऱ्या, ग्रामपंचायती, विविध कार्यकारी सोसायट्यामध्ये इंटरेस्ट दाखवून त्यांचे महत्त्व कमी करणाऱ्या, तसेच व्यापारी वर्ग व तरुणांना दिशाहीन करणाऱ्या, ट्रस्ट व गावांनाही विचारात न घेता कारभार हाकणाऱ्या आमदार शेळकेंना घरी बसवा. – बापूसाहेब भेगडे, अपक्ष उमेदवार, मावळ विधानसभा
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– ‘महायुतीचा उमेदवार असताना अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देणे म्हणजे राजकीय आत्महत्या’
– आमदार सुनिल शेळके यांच्यासह दोघांवर गुन्हा दाखल, रात्री दहानंतर प्रचार फेरी काढल्याने गुन्हा । Mla Sunil Shelke
– बापूसाहेब भेगडे यांच्या गाव भेटीत तरुण कार्यकर्ते, जेष्ठ नागरिक व महिलांचा मोठा प्रतिसाद । Bapu Bhegade