व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, September 30, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘महायुतीचा उमेदवार असताना अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देणे म्हणजे राजकीय आत्महत्या’

महायुतीचा अधिकृत उमेदवार असताना विरोधातील अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देणे म्हणजे राजकीय आत्महत्या असल्याचे मत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेश सचिव सूर्यकांत वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
November 8, 2024
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, शहर
RPI leader Suryakant Waghmare press conference at Lonavla Maval Assembly Election

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : महायुतीचा अधिकृत उमेदवार असताना विरोधातील अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देणे म्हणजे राजकीय आत्महत्या असल्याचे मत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेश सचिव सूर्यकांत वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. मावळात आम्ही मागील 15 वर्षाचा मित्र असलेल्या भाजपाच्या प्रमुख नेत्यांच्या सोबत राहण्याची भूमिका स्वीकारली होती मात्र त्यांनी आम्हाला डावलले, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले यांना भेटा असे सांगितले मात्र त्यांनी आठवले साहेब यांना भेटणे टाळले.

ते बारामतीत शरदचंद्र पवार साहेब यांच्या घरी गेले, मुंबईत राजसाहेब ठाकरे यांच्या घरी गेले मात्र आमच्या रामदासजी आठवले साहेब यांच्या घरी गेले नाही, वारंवार आम्ही सांगून देखील ते आम्हाला बाजूला ठेवत होते. माझ्या राजकीय कारकिर्दीला धक्का देण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू असल्याचे आमच्या लक्षात आल्याने आम्ही विकासाच्या मुद्द्यावर मावळात महायुतीचे उमेदवार सुनील शेळके यांना पाठिंबा देण्याचा जाहीर केले आहे.

महाराष्ट्रात महायुतीची सत्ता येणार हे निश्चित आहे. त्यामुळे आगामी काळात या तालुक्यातील व राज्यातील आंबेडकरी जनतेला न्याय मिळवून द्यायचा असेल तर प्रश्न मार्गी लावायचे असतील तर महायुती शिवाय पर्याय नसल्याने व रामदास आठवले साहेब यांचा आदेश असल्याने आम्ही पूर्ण ताकतीने महायुतीचे उमेदवार सुनील शेळके यांचे काम करणार आहे. त्यांना निवडून आणणे ही आमची जबाबदारी असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे मावळ तालुका अध्यक्ष लक्ष्मण भालेराव, लोणावळा शहराध्यक्ष कमलाशिल म्हस्के, पुणे जिल्ह्याचे नेते गणेश गायकवाड, महिला उपाध्यक्ष यमुना साळवे, माजी नगरसेवक दिलीप दामोदरे, मालन बनसोडे, अंकुश सोनवणे, विजय देसाई यांच्यासह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– महायुतीचा धर्म पाळणार, शेळकेंना विजयी करणार ! सुनिल शेळके यांच्यासाठी भाजपाचे कार्यकर्ते एकवटले
– …तर विरोधकांवर धमक्यांचे फोन करण्याची वेळच येणार नाही – आमदार सुनिल शेळके
– लोणावळा ग्रामीण पोलिसांचा पवनानगर, तिकोनापेठ येथे रुट मार्च । Lonavala Police


dainik maval jahirat

Previous Post

आमदार सुनिल शेळके यांच्यासह दोघांवर गुन्हा दाखल, रात्री दहानंतर प्रचार फेरी काढल्याने गुन्हा । Mla Sunil Shelke

Next Post

मावळ विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांना तालुक्यातून वाढता पाठिंबा । Bapu Bhegade

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Maval Taluka Warkari Sampradaya Mandal declared support to Bapusaheb Bhegde

मावळ विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांना तालुक्यातून वाढता पाठिंबा । Bapu Bhegade

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

BJP takes an aggressive stance against MLA Sunil Shelke statement demands registration of case

आमदार सुनील शेळके यांच्या वक्तव्याविरोधात भाजपा आक्रमक ; गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 30, 2026
Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.