कामशेत (ता. मावळ) येथे मुंबई – पुणे महामार्ग लगत असलेल्या अतिक्रमणाबाबत छायाचित्रासह वृत्तपत्रांमध्ये बातमी दिल्याचा राग मनामध्ये धरत पत्रकारांना शिवीगाळ आणि दमदाटी केल्याचा धक्कादायक प्रकार कामशेत येथे घडला आहे. लोकशाहीचा गळा घोटण्याचा आणि लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारितेला धक्का लावण्याचा प्रकार घडल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. तसेच याबाबत मावळ तालुक्यातील पत्रकारांनी कामशेत पोलीस ठाण्यामध्ये तक्रार अर्ज दिल्यानंतर त्या ठिकाणी संबंधितावर अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पत्रकार चेतन मोहन वाघमारे यांनी दिलेल्या तक्रारीवरून सिराज शेख (वय 35, रा. कामशेत, सिराज शेख याची आई आणि त्याचा भाऊ (संपूर्ण नाव व पत्ता माहिती नाही) त्यांच्या विरोधात कामशेत पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
कामशेत भागातील पत्रकारांनी मुंबई – पुणे राष्ट्रीय महामार्गा लगत अतिक्रमण झाले असल्याच्या बातम्या छायाचित्रांसह मागील पंधरा दिवसात विविध पेपर मध्ये प्रसिद्ध केल्या होत्या. त्यानंतर, ‘त्या बातम्यांमध्ये आमच्या दुकानाचा फोटो का टाकला? असे म्हणत तुम्हाला मस्ती आली आहे का? तुम्ही अतिक्रमणाची बातमी कशी लावली?’ असे म्हणत शिवीगाळ केली आणि, ‘तुम्हाला बघून घेतो’ अशा प्रकारची दमदाटी केल्याचे फिर्यादीत नमूद असल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( case has been registered for harassment of journalists at Kamshet in Maval taluka )
अधिक वाचा –
– मावळ लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस; आतापर्यंत 18 उमेदवारांकडून नामनिर्देशन अर्ज दाखल
– ना कुठली चर्चा, ना कोणता गाजावाजा ! मावळ लोकसभेसाठी ‘वंचित’च्या उमेदवार माधवी जोशी यांनी शांततेत भरला उमेदवारी अर्ज। Maval Lok Sabha
– अब्जाधीश ‘आप्पा’ ! 5 वर्षात 29 कोटींची वाढ, श्रीरंग बारणेंची एकूण संपत्ती किती? हिरे-सोने, महागड्या गाड्या आणि बरंच काही, वाचा सविस्तर । Shrirang Barane Property