लोणावळा शहरातील तुंगार्ली परिसरातील एका बंगल्याच्या प्रांगणात काही लोक सार्वजनिक शांततेचा भंग करुन रात्री उशीरापर्यंत साऊंड सिस्टम लावून मोठमोठ्याने गाणी लावून त्यांनी सोबत आणलेल्या नर्तिका (मुलींकडुन) अश्लील हावभाव करुन नाच करायला लावत आहेत, अशी माहिती सहाय्यक पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी लोणवळा, IPS सत्यसाई कार्तिक यांना मिळाली. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
त्यांनी तत्काळ याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी आणि लोणावळा शहर पोलीस स्टेशन यांच्याकडील पोलीस स्टाफ यांची संयुक्त टीम तयार करून कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पथकाने सदर बंगल्यावर छापा टाकला. तेव्हा तिथे अश्लील हावभाव करुन साऊंड सिस्टम लावुन मोठमोठ्याने गाणी लावून नाच करुन सार्वजनिक शांततेचा भंग करत असलेल्या एकुण 10 जणांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातील साउंड सिस्टम जप्त करुन त्यांच्यावर लोणावळा शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( Cases filed against 10 persons for disturbing public peace Lonavala city police action )
सदर घटनेनंतर लोणावळा शहर भागातील बंगले धारकांचे धाबे दणाणले आहेल. पोलिसांनी देखील, लोणावळा शहर व परिसरातील बंगले मालकांना आवाहन करण्यात केले आहे. की, त्यांनी त्यांच्याकडील बंगला भाड्याने देताना त्यांच्या बंगल्या मध्ये कोणतेही बेकायदेशीपणे कृत्य होणार नाहीत याची दक्षता घेणे, बंगला भाड्याने दिलेली माहिती पोलीस स्टेशनला सादर करणे याबाबत आवाहन केले आहे. अन्यथा कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. आयपीएस सत्यसाई कार्तिक (सहा. पोलीस अधिक्षक लोणावळा विभाग) आणि सुहास जगताप (पोलीस निरीक्षक लोणावळा शहर पोलीस स्टेशन) यांच्याकडून हे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच, लोणावळा शहरातील भाड्याने दिले जाणाऱ्या बंगल्याची माहिती संकलित करण्याचे काम लोणावळा शहर पोलीस स्टेशन कडून करण्यात येत आहे. त्यामुळे ज्यांचे बंगले भाड्याने दिले जात आहे, त्यांनी तात्काळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधून आपल्या बंगल्याची माहिती सादर करावी, असेही आवाहन करण्यात आले आहे. तुंगार्ली येथील कारवाईत ताब्यात घेतलेल्या आरोपींवर IPC – 294,34 आणि Mah Police Act 33(N),131 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक पंकज देशमुख (पुणे ग्रामीण) यांच्या आदेशान्वये आणि अपर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, सहा. पोलीस अधिक्षक सत्यासाई कार्तिक लोणावळा उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा शहर पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्या सुचनेनुसार पोसई श्रीकांत जोशी, पोहवा आबनावे, पोना शिंदे, पोशि सोनवणे, मपोशि निंबाळकर, पोशि शिंदे, पोशि येळवंडे, चापोहवा घोंगडे, चापोना पवार यांनी केली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोसई श्रीकांत जोशी हे करत आहेत.
अधिक वाचा –
– रविवारची सकाळ भीषण अपघाताने! द्रुतगती मार्गावर नवीन बोगद्याजवळ अपघातात टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू । Accident On Mumbai Pune Expressway
– मावळ, पुणे, बारामती आणि शिरुर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 11 हजार 898 मतदान यंत्रांची सरमिसळ । Pune News
– लोणावळा येथील शिवदुर्ग मित्र संस्थेचे सुनिल गायकवाड यांची महाराष्ट्र शासनाकडून ‘मानद प्राणी कल्याण अधिकारी’ म्हणून नेमणूक