व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, July 26, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

लोणावळ्यात रात्री अपरात्री गोंधळ घालणाऱ्या हुल्लडबाजांवर कारवाई; अश्लील हावभाव करून नाच करणाऱ्या नर्तिकांसह 10 जणांवर गुन्हे दाखल

सदर घटनेनंतर लोणावळा शहर भागातील बंगले धारकांचे धाबे दणाणले आहेल. पोलिसांनी देखील, लोणावळा शहर व परिसरातील बंगले मालकांना आवाहन करण्यात केले आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 7, 2024
in पुणे, ग्रामीण, लोकल, शहर
Lonavla-City-Police-Station

Photo Courtesy : File Photo : Lonavla City Police Station


लोणावळा शहरातील तुंगार्ली परिसरातील एका बंगल्याच्या प्रांगणात काही लोक सार्वजनिक शांततेचा भंग करुन रात्री उशीरापर्यंत साऊंड सिस्टम लावून मोठमोठ्याने गाणी लावून त्यांनी सोबत आणलेल्या नर्तिका (मुलींकडुन) अश्लील हावभाव करुन नाच करायला लावत आहेत, अशी माहिती सहाय्यक पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी लोणवळा, IPS सत्यसाई कार्तिक यांना मिळाली. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

त्यांनी तत्काळ याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी आणि लोणावळा शहर पोलीस स्टेशन यांच्याकडील पोलीस स्टाफ यांची संयुक्‍त टीम तयार करून कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पथकाने सदर बंगल्यावर छापा टाकला. तेव्हा तिथे अश्लील हावभाव करुन साऊंड सिस्टम लावुन मोठमोठ्याने गाणी लावून नाच करुन सार्वजनिक शांततेचा भंग करत असलेल्या एकुण 10 जणांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातील साउंड सिस्टम जप्त करुन त्यांच्यावर लोणावळा शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( Cases filed against 10 persons for disturbing public peace Lonavala city police action )

सदर घटनेनंतर लोणावळा शहर भागातील बंगले धारकांचे धाबे दणाणले आहेल. पोलिसांनी देखील, लोणावळा शहर व परिसरातील बंगले मालकांना आवाहन करण्यात केले आहे. की, त्यांनी त्यांच्याकडील बंगला भाड्याने देताना त्यांच्या बंगल्या मध्ये कोणतेही बेकायदेशीपणे कृत्य होणार नाहीत याची दक्षता घेणे, बंगला भाड्याने दिलेली माहिती पोलीस स्टेशनला सादर करणे याबाबत आवाहन केले आहे. अन्यथा कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. आयपीएस सत्यसाई कार्तिक (सहा. पोलीस अधिक्षक लोणावळा विभाग) आणि सुहास जगताप (पोलीस निरीक्षक लोणावळा शहर पोलीस स्टेशन) यांच्याकडून हे आवाहन करण्यात आले आहे.

तसेच, लोणावळा शहरातील भाड्याने दिले जाणाऱ्या बंगल्याची माहिती संकलित करण्याचे काम लोणावळा शहर पोलीस स्टेशन कडून करण्यात येत आहे. त्यामुळे ज्यांचे बंगले भाड्याने दिले जात आहे, त्यांनी तात्काळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधून आपल्या बंगल्याची माहिती सादर करावी, असेही आवाहन करण्यात आले आहे. तुंगार्ली येथील कारवाईत ताब्यात घेतलेल्या आरोपींवर IPC – 294,34 आणि Mah Police Act 33(N),131 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई पोलीस अधिक्षक पंकज देशमुख (पुणे ग्रामीण) यांच्या आदेशान्वये आणि अपर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, सहा. पोलीस अधिक्षक सत्यासाई कार्तिक लोणावळा उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा शहर पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्या सुचनेनुसार पोसई श्रीकांत जोशी, पोहवा आबनावे, पोना शिंदे, पोशि सोनवणे, मपोशि निंबाळकर, पोशि शिंदे, पोशि येळवंडे, चापोहवा घोंगडे, चापोना पवार यांनी केली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोसई श्रीकांत जोशी हे करत आहेत.

अधिक वाचा –
– रविवारची सकाळ भीषण अपघाताने! द्रुतगती मार्गावर नवीन बोगद्याजवळ अपघातात टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू । Accident On Mumbai Pune Expressway
– मावळ, पुणे, बारामती आणि शिरुर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 11 हजार 898 मतदान यंत्रांची सरमिसळ । Pune News
– लोणावळा येथील शिवदुर्ग मित्र संस्थेचे सुनिल गायकवाड यांची महाराष्ट्र शासनाकडून ‘मानद प्राणी कल्याण अधिकारी’ म्हणून नेमणूक


dainik maval jahirat

Previous Post

भारतीय जनता पार्टी स्थापना दिनानिमित्त मावळ तालुक्यात पक्षाच्या जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांचा सन्मान । BJP Foundation Day

Next Post

मोठी बातमी! लोकसभा निवडणूकीत मतदानाच्या दिवशी मतदारसंघात सार्वजनिक सुट्टी जाहीर, राज्य सरकारचा निर्णय

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
voting

मोठी बातमी! लोकसभा निवडणूकीत मतदानाच्या दिवशी मतदारसंघात सार्वजनिक सुट्टी जाहीर, राज्य सरकारचा निर्णय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.