नुकतीच बिहार राज्यामध्ये स्वतंत्रपणे जातनिहाय जनगणना झाली आहे. तामिळनाडू, छत्तीसगड आणि इतर अनेक राज्यांनी सुद्धा ओबीसी जनगणना केल्या असून त्यांच्या राज्याच्या विकासासाठी त्यांचा उपयोग झालेला आहे. महाराष्ट्रातही जातनिहाय जनगणना करण्याबाबतची गेल्या कित्येक वर्षांपासूनची मागणी प्रलंबित आहे. जनगणना हा विषय केंद्र शासनाशी संबंधित आहे. मात्र इतर मागासवर्गाची स्वतंत्र जनगणना करण्यासाठी केंद्र सरकारने असमर्थता व्यक्त केली आहे. त्यामुळे राज्य शासनाने बिहार सरकारप्रमाणे ओबीसींची स्वतंत्र जनगणना करावी. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
देशातील अनुसुचित जाती व जमातींची जातवार जनगणना करून दीडशे वर्षे होत आलेली आहे. स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने फक्त अनुसुचित जाती व जमाती यांची जातनिहाय तर इतर सर्वांची एकत्रित गणना करण्याचे धोरण स्विकारले. यातुन इतर मागासवर्गीय (ओबीसी) वंचित राहिले. सन 1994 साली केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने ओबीसी जनगणना कशी आवश्यक आहे. ते सरकारला तिसऱ्यांदा पटवून दिले. सन 2010 साली 100 खासदारांनी ओबीसी जनगणनेचा ठराव केला. त्यासाठी देशाचे नेते सन्माननीय श्री शरद पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय प्रयत्न केले गेले होते. त्यातुन 2011 ते 2014 मध्ये केंद्राने सामाजिक व आर्थिक जातगणना केली. मात्र त्याची आकडेवारी राज्यांना दिली गेलेली नाही.
देशात सन 2021 सालच्या नियमित जनगनणेचे काम अद्याप व्हायचे आहे, त्यात ही जातनिहाय गणना करावी अशी आमची सातत्याने मागणी आहे. बिहारप्रमाणेच महाराष्ट्र शासनाने इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग यांची जातीनिहाय जनगणना करावी, अशी राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी ओबीसी सेल प्रदेशाध्यक्ष राज राजापुरकर आणि तसेच तमाम ओबीसी संघटनांची मागणी आहे. या मागणीचा गांभिर्याने विचार करत जातीनिहाय जनगणना करण्यासाठी राज्य शासनाकडे शिफारस करावी. ( caste wise census in maharashtra demand by ncp obc cell to pune collector )
अशा आशयाचे निवेदन पुणे जिल्हा व शहर राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी ओबीसी सेल च्या वतीने पुणे निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम मॅडम यांना निवेदन देत मागणी केली. यावेळी पुणे जिल्हाध्यक्ष अतुल राऊत, पुणे शहराध्यक्ष दिपक जगताप, कार्याध्यक्ष संजय जकाते, पुणे शहर उपाध्यक्ष विश्वास ननावरे, नगरसेवक मंगेश खैरे, पुरंदर तालुकाध्यक्ष प्रकाश भालेराव, कोथरूड विधानसभा अध्यक्ष संतोष चव्हाण, शिवाजीनगर विधानसभा अध्यक्ष अभिमन्यू धोत्रे, कॅन्टोन्मेंट विधानसभा अध्यक्ष मंगेश हिरणवार, हडपसर विधानसभा अध्यक्ष जयश्री आदमाने, शिवाजीनगर विधानसभा कार्याध्यक्ष हरिदास पवार, वेल्हा तालुका अध्यक्ष लक्ष्मण तावरे, मावळ तालुका वरिष्ठ उपाध्यक्ष सोमनाथ धोंगडे, वडगाव शहर अध्यक्ष मयुर गुरव सह ओबीसी चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते.
अधिक वाचा –
– बाळासाहेब ठाकरे यांचा 11वा स्मृतीदिन : शिवसेनाप्रमुखांच्या आयुष्यातील हे महत्वाचे टप्पे माहितीयेत का? नक्की वाचा
– चंदनवाडी शाळेतील विद्यार्थ्यांची दिवाळी गोड; लायन्स क्लबकडून शैक्षणिक साहित्यांसह फराळ वाटप
– ‘रयत विद्यार्थी विचार मंच’कडून परंदवडी गावात गरीब – कष्टकरी आदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरी