व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, June 13, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

बाळासाहेब ठाकरे यांचा 11वा स्मृतीदिन : शिवसेनाप्रमुखांच्या आयुष्यातील हे महत्वाचे टप्पे माहितीयेत का? नक्की वाचा

तब्येत खालावल्याने बाळासाहेब ठाकरे ( Balasaheb Thackeray ) यांना मुंबईतील ( Mumbai ) लिलावती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. 15 नोव्हेंबर रोजी बाळासाहेबांना श्वास घेण्यात अडचण येऊ लागली. 17 नोव्हेंबर 2012 रोजी दुपारी 3.30 मिनिटांनी बाळासाहेब ठाकरे यांचे निधन ( Death ) झाले.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
November 19, 2023
in महाराष्ट्र, देश-विदेश, मावळकट्टा
Balasaheb-Thackeray-Image

File Image : Balasaheb Thackeray Image By Dainik Maval


शिवसेना ( Shiv Sena ) पक्षाचे संस्थापक, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ( Balasaheb Thackeray ) यांचे आजच्याच दिवशी म्हणजे 17 नोव्हेंबर 2012 रोजी निधन ( Death Anniversary ) झाले होते. त्यांच्या निधनानंतर मुंबईत ( Mumbai ) बाळासाहेबांचे अखेरचे दर्शन घ्यायला न भूतो न भविष्यती अशी सामान्य माणसांची गर्दी जमली होती. ‘एक व्यंगचित्रकार ते महाराष्ट्राच्या राजकारणातील कधीही न शमणारे वादळ’ होईपर्यंतचा बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनप्रवास ( Balasaheb Thackeray Life Journey ) अनेक राजकारण्यांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या आयुष्यातील काही महत्वाच्या घटनांमधून आपण तो समजून घेऊयात… ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

बाळासाहेब ठाकरे यांच्या 86 वर्षांच्या आयुष्यातील काही महत्वाचे टप्पे

1926 : बाळ केशव ठाकरे उर्फ बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म 23 जानेवारी 1926 रोजी मुंबईतील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे वडील केशव सिताराम ठाकरे म्हणजे प्रबोधनकार ठाकरे हे समाजसुधारक होते.

1955 : बाळासाहेबांनी त्यांच्या कारकिर्दीची एक व्यंगचित्रकार म्हणून सुरुवात केली. इंग्रजी वृत्तपत्र द फ्री प्रेस जर्नलमध्ये ते कार्टून रंगवायचे.

tata tiago ads may 2025

1960 : बाळासाहेब आणि त्यांचे बंधू श्रीकांत ठाकरे यांनी मार्मिक हे राजकीय व्यंगचित्रण करणारे मासिक सुरू केले.

19 जून 1966 : “प्रबोधनकार ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना या मराठी भाषकांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या राजकीय पक्षाची स्थापना केली.”

1984 : शिवसेनेने हिंदूत्व या मुद्द्यावर भाजपासोबत युती केली आणि त्याच्या पुढच्याच वर्षी शिवसेनेने भाजपाच्या सहाय्याने मुंबई महापालिकेची निवडणूक जिंकली.

1989 : बाळासाहेब ठाकरे यांनी सामना या वृत्तपत्राची स्थापना केली

1992 : बाबरी मशिदीच्या पाडावाचे बाळासाहेबांनी समर्थन केले.

1995 : महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजपा युतीचे सरकार आले आणि शिवसेनेचे मनोहर जोशी मुख्यमंत्री बनले.

1996 : बाळासाहेबांचे सुपूत्र बिंदूमाधव ठाकरे यांचे 20 एप्रिल 1996 रोजी मुंबई-नाशिक हायवेवर अपघाती निधन झाले.

1999 : निवडणूक आयोगाने बाळासाहेब ठाकरे यांना 6 वर्षांसाठी मतदान करण्यावर बंदी घातली.

2004 : उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांची शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली.

2006 : राज ठाकरे यांनी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला. तसेच, त्यांनी 9 मार्च 2006 साली स्वतंत्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची स्थापना केली.

2009 : बाळासाहेब ठाकरे यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली.

2012 : तब्येत खालावल्याने बाळासाहेबांना मुंबईतील लिलावती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. 15 नोव्हेंबर रोजी बाळासाहेबांना श्वास घेण्यात अडचण येऊ लागली. 17 नोव्हेंबर 2012 रोजी दुपारी 3.30 मिनिटांनी बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाले. ( Mumbai Shiv Sena Party Founder Shivsena Chief Hindu Hridayasamrat Balasaheb Thackeray Life Journey )

अधिक वाचा –
– जनरल मोटर्सच्या कामगारांचे आंदोलन : महिलांनी काळ्या साड्या नेसून दिल्या मंत्री सुरेश खाडेंना भाऊबीजेच्या शुभेच्छा
– अनेक वर्षांपासूनचा प्रश्न मार्गी लागला! पवन मावळात बनणार पर्यटनाचा नवा ‘राजमार्ग’, आमदार शेळकेंकडून भूमिपूजन
– भाजपाचे ‘एक दिवा वंचितांसाठी’ अभियान; अहिरवडे येथील आदिवासी वस्तीवर फराळ वाटप करुन दिवाळी साजरी


dainik maval ads may 2025

Previous Post

चंदनवाडी शाळेतील विद्यार्थ्यांची दिवाळी गोड; लायन्स क्लबकडून शैक्षणिक साहित्यांसह फराळ वाटप

Next Post

आंदर मावळातील रस्त्यासाठी 95 लाखांचा निधी; पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भूमिपूजन संपन्न

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Andar-Maval

आंदर मावळातील रस्त्यासाठी 95 लाखांचा निधी; पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भूमिपूजन संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Dehu-Road-Police-Station

एकीवर दोघांचे प्रेम आणि सोळा वर्षीय मुलाची हत्या… देहूरोड हादरलं ! भेटायला बोलावलं आणि चाकूने भोकसलं । Dehu Road Crime

June 12, 2025
Ahmedabad plane crash

अहमदाबाद विमान दुर्घटना : विमानातील एक प्रवासी बचावला, उर्वरित सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती, मृतांमध्ये माजी मुख्यमंत्र्यांचा समावेश । ahmedabad plane crash

June 12, 2025
Ahmedabad plane crash

ahmedabad plane crash : अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान कोसळले ; २४२ प्रवाशांना घेऊन लंडनला जात होतं विमान

June 12, 2025
Kalpana Chawla Space Academy started in Lonavala Students from rural areas will get priority

लोणावळा शहरात सुरू झाली ‘कल्पना चावला स्पेस अकॅडमी’ ; ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मिळणार प्राधान्य । Lonavala News

June 12, 2025
Dehu Nagar Panchayat administration takes immediate action Encroachments on roads removed

आमदार सुनील शेळके यांच्या आदेशानंतर देहू नगरपंचायत प्रशासनाची तातडीने कारवाई ; रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविली । Dehu News

June 12, 2025
Major changes in traffic in Dehugaon area on occasion of Sant Tukaram Maharaj Bij ceremony

महत्वाची बातमी ! लोणावळा शहर आणि मावळ ग्रामीण परिसरात वाहतुकीत मोठे बदल – पाहा पर्यायी मार्ग

June 12, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.