व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, August 3, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

आंदर मावळातील रस्त्यासाठी 95 लाखांचा निधी; पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भूमिपूजन संपन्न

आंदर मावळातील ग्रामीण भागात दळणवळणाला गती मिळावी यासाठी वडेश्वर-कशाळ-ठोकळवाडी धरणालगत काम सुरु असलेल्या पुलाला जोडणाऱ्या रस्त्याच्या कामाचे भुमिपुजन नुकतेच संपन्न झाले.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
November 17, 2023
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल
Andar-Maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


आंदर मावळातील ग्रामीण भागात दळणवळणाला गती मिळावी यासाठी वडेश्वर-कशाळ-ठोकळवाडी धरणालगत काम सुरु असलेल्या पुलाला जोडणाऱ्या रस्त्याच्या कामाचे भुमिपुजन नुकतेच संपन्न झाले. सदर रस्ता आठशे मीटर लांब आणि साडेपाच मीटर रुंद होणार असून यासाठी एकूण 95 लक्ष निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

आमदार सुनिल शेळके यांच्या माध्यमातून आंदर मावळमधील नदीवरील पूल, रस्ता रुंदीकरण, नवीन रस्ता करणे यासाठी एकुण 46 कोटी 96 लक्ष रुपयांची विविध विकासकामे सध्या वेगाने सुरू आहेत. ग्रामीण भागातील गावांना जोडणारे अंतर कमी व्हावे यासाठी वडेश्वर- कशाळ – ठोकळवाडी धरणालगत असलेल्या पुलाचे काम देखील प्रगती पथावर असून लवकरच हा पुल वाहतूकीसाठी खुला होणार आहे. त्यामुळे आंदर मावळातील दोन भागात विभागलेल्या गावांच्या दळणवळणाला मोठी गती मिळणार आहे. दरम्यान, यावेळी आमदार सुनिल शेळके यांच्या माध्यमातून आंदर मावळासह मावळ तालुक्यातील विकासकामांची घौडदौड येणाऱ्या काळात देखील अशीच सुरु ठेवण्यासाठी आम्ही सदैव त्यांच्यासोबत असल्याची ग्वाही पदाधिकाऱ्यांनी दिली. ( Andar Maval Vadeshwar Kashal Thokalwadi Road Bhumi Poojan )

या भुमिपुजन प्रसंगी संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष नारायण ठाकर, पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक उपाध्यक्ष बाबाजी गायकवाड, मा.चेअरमन नारायण मालपोटे, कल्हाट सरपंच शिवाजी करवंदे, माजी सरपंच बळीराम भोईरकर, राष्ट्रवादी काँग्रेस सरचिटणीस दिगंबर आगिवले, माजी उपसरपंच तुकाराम जाधव, मा. सरपंच विठ्ठल जाधव, शरद जाधव, अनिल जाधव, प्रशांत जाधव, सोमनाथ जाधव, नवनाथ जाधव, दत्ता जाधव, सुदाम ठाकर, गोरख पिंगळे, रोशन पिंगळे, मारुती करवंदे, वैभव पिंगळे, उत्तम शिंदे, मारुती जाधव, नंदू मदगे, मंगेश जाधव, नंदाराम जाधव,देविदास धनवे, छबू वाईकर, सुभाष पिंगळे,भरत जोरी, संतोष जाधव, मच्छिंद्र जगताप, सुभाष मा. जाधव, तानाजी शिंदे,शंकर जाधव आदी उपस्थित होते.

अधिक वाचा –
– ‘रयत विद्यार्थी विचार मंच’कडून परंदवडी गावात गरीब – कष्टकरी आदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरी
– जनरल मोटर्सच्या कामगारांचे आंदोलन : महिलांनी काळ्या साड्या नेसून दिल्या मंत्री सुरेश खाडेंना भाऊबीजेच्या शुभेच्छा
– अनेक वर्षांपासूनचा प्रश्न मार्गी लागला! पवन मावळात बनणार पर्यटनाचा नवा ‘राजमार्ग’, आमदार शेळकेंकडून भूमिपूजन


dainik maval jahirat

Previous Post

बाळासाहेब ठाकरे यांचा 11वा स्मृतीदिन : शिवसेनाप्रमुखांच्या आयुष्यातील हे महत्वाचे टप्पे माहितीयेत का? नक्की वाचा

Next Post

शिंदे सरकारचा मोठा निर्णय! ग्रामपंचायत कार्यालय बांधण्यासाठी आता मिळणार 25 लाखांचा निधी, वाचा सविस्तर

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
eknath-shinde

शिंदे सरकारचा मोठा निर्णय! ग्रामपंचायत कार्यालय बांधण्यासाठी आता मिळणार 25 लाखांचा निधी, वाचा सविस्तर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Alert issued for various districts in state heavy rain accompanied by lightning forecast for next five days

राज्यातील विविध जिल्ह्यांना अलर्ट जारी ; पुढील पाच दिवसांसाठी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज

August 2, 2026
Live 7-12 extracts distributed to farmers in Maval citizens benefited from Shivaji Maharaj Maharajswa Camp

मावळातील ३३७१ खातेदारांना जिवंत सातबारा वाटप ; छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचा ३३२९ नागरिकांनी घेतला लाभ

August 2, 2026
Pune News : महाळुंगे येथे भूखंडावर जबरदस्तीने प्रवेश व तोडफोडीचा आरोप; परस्परांवर अतिक्रमणाचे आरोप

Pune News : महाळुंगे येथे भूखंडावर जबरदस्तीने प्रवेश व तोडफोडीचा आरोप; परस्परांवर अतिक्रमणाचे आरोप

August 1, 2026
ahilyadevi holkar karjmukti yojna Loan waivers for 2337 farmers in Maval Taluka

मावळ तालुक्यातील 2337 शेतकऱ्यांची एकूण 11 कोटी 21 लाख रूपयांची कर्जमाफी

August 1, 2026
Inauguration of Talegaon Smart City Vision 2035 workshop in-depth brainstorming on planned development

‘तळेगाव स्मार्ट सिटी व्हिजन – २०३५’ कार्यशाळेचे उद्घाटन ; चर्चासत्रात शहराच्या नियोजनबद्ध विकासासाठी सखोल विचारमंथन

August 1, 2026
rain image rain alert heavy rain

पुणे जिल्ह्यात सरासरीच्या १७९.९ टक्के पाऊस ; मावळ तालुक्यात सर्वाधिक १६८० मिलिमीटर पावसाची नोंद

July 31, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.