मावळ तालुक्यातील जनरल मोटर्स कंपनीतील कामगारांचे मागील 45 दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. कामगार वर्ग कुटुंबीयांसोबत तळेगाव एमआयडीसी रोड इथे बेमुदत साखळी उपोषण करत आहेत. मावळात पहिल्यांदाच जनरल मोटर्सच्या आंदोलक कामगारांनी काळी दिवाळी साजरी केली. ह्यासह बुधवारी (दि. 15 नोव्हेंबर) भाऊबीजेच्या दिवशी महिलांनी काळ्या साड्या नेसून कामगार मंत्री सुरेश खाडे यांना भाऊबीजेच्या शुभेच्छा दिल्या. तसेच मोठ्या संख्येने काही कामगार आंदोलक हे मंत्री सुरेश खाडे यांच्या बंगल्यासमोर आंदोलनाला गेले होते.
जनरल मोटर्स कंपनी आणि राज्य सरकार यांच्याकडून होत असलेल्या अन्यायाविरोधात बुधवारी कामगारांच्या परिवारातील महिलांनी काळ्या साड्या नेसून प्रतिनिधिक स्वरूपात कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या प्रतिमेला भाऊबीज ओवाळून निषेध नाेंदविला.तळेगाव दाभाडे एमआयडीसीमधील बंद पडलेल्या जनरल मोटर्स कंपनीचे कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांनी दिवाळी सणात अनाेख्या पद्धतीचे आंदाेलन केल्याने सर्वत्र याची आता चर्चा होत आहे. तब्बल 45 दिवसांपासून सुरु असलेले हे आंदोलन आता अधिक तीव्र होताना दिसत आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
जनरल मोटर्स कंपनीच्या कामगारांच्या या बेमुदत साखळी उपोषणामुळे दसरा सण आणि त्यानंतर दिवाळी सण, हे दोन्ही सण कामगार रस्त्यावर बसून आंदोलन करत आहे. बुधवारी महिलांनी काळ्या साड्या नेसून कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या प्रतिमेला भाऊबीज ओवाळल्यानंतर, ‘एक हजार कामगारांच्या नोकऱ्या वाचाव्यात हीच ओवाळणी आम्हाला द्यावी’ अशी अपेक्षा व्यक्त केली. ( Black Diwali From General Motors Company workers Maval Taluka )
अधिक वाचा –
– वंचित बहुजन युवा आघाडीची मावळ तालुका आणि लोणावळा शहर नुतन कार्यकारिणी जाहीर, पाहा संपूर्ण यादी
– शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या कोणावरही अन्याय होणार नाही – खासदार श्रीरंग बारणे
– दिवाळी भेटच्या निमित्ताने फुंकले निवडणूकीचे रणशिंग? मावळ लोकसभेसाठी ‘या’ नगरसेवकाचे नाव चर्चेत