मावळ तालुक्यातील आदर्श प्राथमिक शाळा असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चंदनवाडी या ठिकाणी विद्यार्थ्यांना लायन्स क्लब ऑफ भोसरी यांच्या माध्यमातून दिवाळी भेट देण्यात आली. क्लबच्या सदस्यांनी आदिवासी बहुल भागातील या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसमवेत दिवाळी साजरी करत त्यांची दिवाळी गोड केली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
दिवाळी सणानिमित्त आदिवासी विद्यार्थ्यांना एकात्मिक बालविकास अंगणवाडी, चंदणवाडी व प्राथमिक शाळेमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. शालेय साहित्यामध्ये विद्यार्थ्यांना स्कूल बॅग विविध शैक्षणिक साहित्य तसेच दिवाळीचा खाऊ वाटप करण्यात आला. तसेच महिलांना भाऊबीज निमित्त साडी वाटप करण्यात आली. यातून लायन्स क्लबचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व सदस्य यांनी विद्यार्थ्यांना योग्य असे मार्गदर्शन व प्रेरणा देण्यात आली. ( Gift of educational material to students of Chandanwadi Maval School by Lions Club Bhosari )
अनोखी दिवाळी साजरी केल्यामुळे विद्यार्थी आनंदी वातावरणात होते. यावेळी गावातील सर्व ग्रामस्थ महिला भगिनी अंगणवाडी सेविका शोभाताई थोरवे, मदतनीस जिजाबाई केवळ या उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या उपशिक्षिका अर्चना शिरसाठ मॅडम यांनी केले. सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व स्वागत आभार शाळेचे मुख्याध्यापक विकास रासकर सर यांनी केले.
अधिक वाचा –
– अनेक वर्षांपासूनचा प्रश्न मार्गी लागला! पवन मावळात बनणार पर्यटनाचा नवा ‘राजमार्ग’, आमदार शेळकेंकडून भूमिपूजन
– भाजपाचे ‘एक दिवा वंचितांसाठी’ अभियान; अहिरवडे येथील आदिवासी वस्तीवर फराळ वाटप करुन दिवाळी साजरी
– वंचित बहुजन युवा आघाडीची मावळ तालुका आणि लोणावळा शहर नुतन कार्यकारिणी जाहीर, पाहा संपूर्ण यादी