Dainik Maval News : मध्य रेल्वे कडून मुंबई विभागात महत्त्वाचे काम हाती घेण्यात येणार आहे. यामुळे पुणे-मुंबई रेल्वे सेवा तीन दिवस मोठ्या प्रमाणात विस्कळीत होणार आहे.
लोणावळा स्थानकाच्या यार्डमध्ये रिमॉडेलिंग आणि आर अँड डी मार्गिकेचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे. यासाठी रेल्वे प्रशासनाने ७, ८ आणि १० डिसेंबर रोजी ‘ब्लॉक’ घेतला आहे. या कामामुळे मेल-एक्स्प्रेस गाड्यांसह लोकल सेवांवरही थेट परिणाम होणार आहे. या ब्लॉकमुळे अनेक महत्त्वाच्या आणि रोज धावणाऱ्या एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
शनिवारी (७ डिसेंबर) धावणारी पुणे-मुंबई इंटरसिटी एक्स्प्रेस आणि पुणे-मुंबई इंद्रायणी एक्स्प्रेस रद्द राहतील. रविवार, ८ डिसेंबर रोजी तर तब्बल १२ गाड्यांची अप-डाउन सेवा थांबवण्यात आली आहे. यामध्ये मुंबई-पुणे-मुंबई इंटरसिटी एक्स्प्रेस, इंद्रायणी एक्स्प्रेस, डेक्कन एक्स्प्रेस, प्रगती एक्स्प्रेस, डेक्कन क्वीन एक्स्प्रेस आणि सिंहगड एक्स्प्रेस या महत्त्वाच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांनाही या ब्लॉकचा फटका बसणार आहे. ६ आणि ७ डिसेंबर रोजी धावणाऱ्या जोधपूर-हडपसर एक्स्प्रेस, ग्वाल्हेर-दौंड, मुंबई-भुवनेश्वर कोणार्क एक्स्प्रेस, मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेस, मुंबई-हैदराबाद एक्स्प्रेस, आणि पनवेल-नांदेड एक्स्प्रेस या गाड्यांना एक ते तीन तास उशीर होण्याची शक्यता आहे.
तसेच, राजकोट-कोईम्बतूर, कुर्ला-चेन्नई, पुणे-जयपूर, आणि पुणे-एर्नाकुलम या गाड्यांनाही सुमारे ४५ मिनिटांचा विलंब होण्याची शक्यता आहे. प्रवाशांनी प्रवास करण्यापूर्वी आपल्या गाडीच्या वेळापत्रकाची खात्री करून घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– राज्यातील सर्व नगरपंचायत, नगरपरिषदांची मतमोजणी २१ डिसेंबरला होणार ; काय आहे नागपूर खंडपीठाचा आदेश? वाचा सविस्तर
– तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट ! सहा जागांवरील निवडणूक स्थगित, ‘हे’ आहे कारण
– कुसगांव बुद्रुक – काले जिल्हा परिषद गटात दत्तात्रय उर्फ भाऊसाहेब गुंड यांचा गावभेट दौरा उत्साहात सुरू
– कार्ला-खडकाळा जिल्हा परिषद गट : आशाताई वायकर यांचा शिलाटणे गावभेट दौरा उत्साहात

