चैतन्य चॅरिटेबल फाउंडेशन संचलित चैतन्य इंटरनॅशनल स्कूल (सीबीएसई) इंदोरी इथे मंगळवारी (दिनांक 29 ऑगस्ट) रोजी रक्षाबंधन हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. रक्षाबंधन हा भावा-बहिणीचा स्नेह, प्रेम आणि उत्साह अशा मिश्र भावनांचा सण आहे. जो सर्व मानवी भावनांपैकी सर्वात उदात्त आहे. चैतन्य चॅरिटेबल फाउंडेशन संचालित चैतन्य इंटरनॅशनल स्कूल (सीबीएसई) इंदुरी शाळेत हा महान सण अनोख्या दृष्टीकोणातून साजरा करण्यात आला. ( Chaitanya International School Indore celebrated Raksha Bandhan in a unique way )
चैतन्य इंटरनॅशनल स्कूलमध्ये व्यवस्थापनाकडून बंधुत्व आणि एकात्मतेच्या भावनेला प्रोत्साहन दिले जाते. बंधुत्वाची भावना व्यक्त करण्यासाठी रक्षा बंधन हा दिवस सर्वात योग्य वाटतो. प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांनी मणी, लेस, रिबन, सिक्वीन्स याचा वापर करून राख्या तयार केल्या आणि आपल्या वर्गमित्रांच्या मनगटाला बांधून नव्या नात्याला सुरुवात केली. रक्षा बांधण्याचा सोहळा हे या दिवसाचे मुख्य आकर्षण होते. विद्यार्थ्यांनी आपल्या छोट्या हातांनी बनवलेल्या सुंदर आणि सुरेख राख्या एकमेकांना बांधल्या.
हेही वाचा – चैतन्य इंटरनॅशनल स्कूल इंदुरी येथील विद्यार्थ्यांनी लोकनृत्यातून घडवले वैभवशाली भारतीय संस्कृतीचे दर्शन
यावेळी, आपण रक्षाबंधन का साजरे करतो? यावर विद्यार्थ्यांनी भाष्य केले. मुख्याध्यापिका जेसी रॉय यांनी कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना संबोधित करताना फलदायी जीवन जगण्यासाठी बंधुत्वाचे नाते जोपासण्याचे आवाहन केले. तसेच, संस्थेचे अध्यक्ष भगवान शेवकर यांनी रक्षाबंधन निमित्त सर्वांना विशेष शुभेच्छा दिल्या. ( Chaitanya International School Indore celebrated Raksha Bandhan in a unique way )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– महादेव जानकरांचा ‘स्वबळाचा’ नारा, लोकसभेच्या सर्व जागा लढणार, भाजपवर घणाघात, स्वतःसाठी मनात बारामती फिक्स?
– शेतकऱ्यांनो..! खरीप हंगाम पीक स्पर्धेत सहभागी व्हा; जाणून घ्या स्पर्धेचे नियम, आवश्यक कागदपत्रे, प्रक्रिया आणि बक्षिसाची रक्कम
– पक्के ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी मावळमध्ये सप्टेंबर महिन्यात ‘या’ दिवशी आरटीओकडून मेळाव्याचे आयोजन