महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळाभाऊ भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा उपाध्यक्ष बाळाभाऊ घोटकुले यांनी मावळ केसरी 2023-24 कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेनिमित्त राष्ट्रीय स्पर्धेकरिता राजमाता जिजाऊ ज्युनिअर कॉलेज लांडेवाडी भोसरी येथील विद्यार्थी कु. चैतन्य शांताराम कोंडभर याची महाराष्ट्र राज्य क्रिकेट संघात निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
माजी राज्यमंत्री बाळाभाऊ भेगडे, ट्रिपल महाराष्ट्र केसरी DYSP विजयभाऊ चौधरी, विधानसभा निवडणूक प्रमुख रवींद्र भेगडे, युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष बाळाभाऊ घोटकुले तसेच राजमाता जिजाऊ महाविद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक करंडे सर, महेशदादा लांडगे स्पोर्ट्स फाउंडेशनचे प्रशिक्षक सचिन शिंगोटेसर, आढले गावच्या सरपंच सुवर्णाताई घोटकुले, माजी उपसरपंच बाळासाहेब महादू घोटकुले तसेच इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. तसेच उपस्थित मान्यवरांकडून व आढले गावच्या ग्रामस्थांकडून बिहार राज्यातील पटना येथे होणाऱ्या राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेसाठी कु. चैतन्य शांताराम कोंडभर याला शुभेच्छा देण्यात आल्या. ( Chaitanya Kondbhar selected in Maharashtra State Cricket Team Felicitated by Bala Bhegade )
अधिक वाचा –
– पत्रकार दिनानिमित्त ‘दर्पणकार’ आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन आणि मावळ तालुक्यातील पत्रकार बांधवांचा सन्मान
– “मामाला त्रास झाला, भाच्याने बदला घेतला..” शरद मोहोळ हत्येचं खरं कारण आलं समोर । Sharad Mohol Murder Case
– शरद मोहोळ हत्या प्रकरण : ‘पोळेकर आणि मोहोळ अनेक दिवसांपासून सोबत, 2 वकिलही कटात सामील?’ वाचा पोलिसांनी दिलेली माहिती