अक्षय्य तृतीयेच्या मंगलमय मुहूर्तावर शुक्रवारी, दिनांक 10 मे रोजी तळेगाव दाभाडे येथील श्री बनेश्वर मंदिरात श्री बनेश्वर महादेवांचा चंदन उटी सोहळा आणि एकतारी भजन सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. चंदन उटी सोहळ्याचे हे 24 वे वर्ष असून या वर्षीही विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यावर्षी 5 किलो चंदनाचा लेप महादेवाच्या शिवलिंगाला लावून तसेच विविध प्रकारच्या 100 किलो फुलांची आकर्षक सजावट करून भव्य असा चंदन उटी सोहळा साजरा करणार आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
श्री बनेश्वर सेवा मंडळ व नगरसेवक संतोषभाऊ भेगडे स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या वतीने दरवर्षी या मुहूर्तावर हा सोहळा आयोजीत केला जातो. अक्षय्य तृतीया हा एक पवित्र मुहूर्त आहे. या दिवशी केलेल्या शुभारंभाचे फल हे अक्षय्य राहते. साडेतीन मुहूतपैिकी एक मुहूर्त असलेला हा दिवस म्हणजे वैशाख शुद्ध तृतीया होय. याच दिवशी भगवान विष्णुंचा सहावा अवतार असेलल्या भगवान परशुरामांचा जन्म झाला. याच दिवशी व्यासमुनिंनी श्री गणेशाला महाभारत सांगुन त्याच्याकडुन लेखन करवुन घेतले. अनादीकाळापासुन हा सण साजरा केला जातोय. ( Chandan Ooty Ceremony at Baneshwar Mahadev Temple in Talegaon Dabhade )
महाभारत, स्कंदपुराण, भविष्यपुराण आदी ग्रथांत या सणाचा उल्लेख आढळतो. या तिथीला दानधर्म, होमहवन, परोपकार, पुजा, भजन केले तर ते कधीही क्षयाला जात नाही. म्हणुन या दिवशी दानधर्म व नविन कार्याला सुरूवात केली जाते. चैत्र व वैशाख या दोन महिन्यांतला अक्षय तृतीया हा दुवा आहे. वैशाखाच्या झळा असह्य होत असताना अक्षय तृतीयेचा गाभा लक्षात घेऊन पाण्याचे कलश दान केले जातात व मंदिरातील मुर्तीना चंदनाचा लेप लाऊन शीतल करतात.
चंदन उटी सोहळा – सकाळी 11 ते सायं 06 वाजेपर्यंत
नित्य महाआरती – सायं 07 वाजता
महाप्रसाद – रात्री 7.30 वाजता
एकतारी भजन सोहळा – रात्री 07 ते 10 पर्यंत
तरी या कार्यक्रमास भाविकांनी उपस्थित राहून महाप्रसादाचा व दर्शनाचा लाभ घ्यावा व कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक वाचा –
– मावळमध्ये धडाडणार अजितदादांची तोफ ! श्रीरंग बारणेंसाठी आज घेणार 2 सभा, पहिली सभा कामशेतमध्ये तर दुसरी पिंपरीत
– संजोग वाघेरे यांच्या प्रचारासाठी स्वतः शरद पवार आणि उद्धव ठाकरे उतरणार मैदानात ! Maval Lok Sabha
– रोटरी क्लबच्या माध्यमातून आणि पॉस्को कंपनीच्या वतीने तळेगाव दाभाडे वाहतूक पोलिसांना संगणक संच भेट । Talegaon Dabhade