सरकारी नोकरी लावण्याचे आमिष दाखवत लाखो रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार मावळ तालुक्यातील ( Maval Taluka ) लोणावळा शहर पोलिस ठाण्याच्या ( Lonavla City Police ) हद्दीत घडलाय. या प्रकरणी वर्षा शांतेश्वर कदम (वय 29 वर्षे – व्यवसाय कॅन्टीन, स. रा. कुरवंडे, मुळ रा. लोहारा जि. उस्मानाबाद) यांनी लोणावळा शहर पोलिसांत फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम – 420, 467, 468, 471, 34 अन्वये आरोपी ओमकार सुनील भावे (रा. कुसगाव ता. मावळ) आणि रचना सुर्वे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ( Cheating With Lure Of Getting Government Job Case Registered At Lonavala City Police )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
प्राप्त माहितीनुसार, लोणावळा येथील आयएनएस शिवाजीमधील कॅन्टिन चालक वर्षा शांतेश्वर कदम या महिलेला ओंकार सुनील भावे आणि त्याची मैत्रीण रचना सुर्वे यांनी ओळखीचा फायदा घेऊन फिर्यादीला भारतीय रेल्वेमध्ये नोकरी लावतो असे सांगत, खोटे अपॉइंटमेंट लेटर दाखवून तसेच भारतीय रेल्वेचे बनावट ओळखपत्र देऊन वेळोवेळी फिर्यादी कडून रोख आणि ऑनलाईन असे एकूण 8 लाख रुपये उकळले. जानेवारी 2019 ते दिनांक 11 ऑक्टोबर 2022 पर्यंत आयएनएस शिवाजी आणि लोणावळा येथे हा प्रकार घडला.
पैसे देऊनही काम होत नसल्याने वर्षा कदम यांनी ओमकार भावे याच्या मागे कामाचा तगादा लावला. याला कंटाळून ओमकार भावे याने वर्षा कदम यांना नोकरीवर हजर होण्याबाबतचे बनावट नियुक्ती पत्र, सरकारी गणवेश आणि कपडेही आणून दिले. मात्र, वर्षा कदम यांना संशय आल्याने त्यांनी शहर पोलिसांत धाव घेतली होती. पुढील तपास मपोसई शिंदे साहेब करत आहेत.
अधिक वाचा –
लोणावळ्यात किरकोळ कारणातून सफाई कर्मचारी महिलेला मारहाण, तरुणावर गुन्हा दाखल, कोयता जप्त I Lonavla Crime
श्री उज्जैन महाकाल मंदिर कॉरिडॉरचे उद्घाटन; लोणावळा शहरात भाजपाकडून विविध मंदिरात महाआरती