मंत्रालयात मेट्रो विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून आणि कर्ज मंजूर करून आर्थिक फसवणूक करणे एका व्यक्तीच्या जीवावर बेतले आहे. फसवणूक झालेल्या संबंधित व्यक्तींनी तब्बल दीड वर्षांनंतर फसवणूक करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत, त्याला बेदम मारहाण करत खून केला. या प्रकरणी पुणे गुन्हे शाखेच्या युनिट तीनने कारवाई करत आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. ( Cheating with the lure of getting a job in the ministry cheater Murdered )
सुनिल नलावडे (वय 36) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर मृताचा भाऊ सुदाम राधाकिसन नलावडे (वय 57) यांनी याबाबत फिर्याद दिली. नऱ्हे येथील अभिनव कॉलेज परिसरातील विश्व अपार्टमेंट येथे शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली होती.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
याप्रकरणी, महेश शंकरराव धुमाळ (वय 32, रा. पिंपळे खालसा, हिवरे कुंभार, पदमावती वस्ती, ता. शिरूर), शिवराज किशोर प्रसाद सिंह (वय 32 रा. मोहितेवाडी, पोस्ट – वडगाव, ता. मावळ), शिवाजी रंगाप्पा तुमाले (वय 56 रा. गंगानगर, फुरसुंगी) आणि अक्षय पोपट आढाव (वय 22 रा. सिरापूर, ता. पारनेर, जि. नगर) या आरोपींना अटक करण्यात आली आहे. यासह पोलिसांनी आरोपींच्या आणखी दोन साथीदारांवर सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ( Cheating with the lure of getting a job in the ministry cheater Murdered )
प्रकरण काय?
सुनील नलावडे याने ओळखीतील कुर्डेकर दाम्पत्याच्या मदतीने महेश धुमाळला मंत्रालयात नोकरी लावण्याचे आमिष दाखवले होते. या शिवाय लोन मंजूर करण्यासाठी काही जणांकडून रक्कम उकळली होती. त्यानंतर दीड वर्षांपासून तो फरार झाला होता. तीन दिवसांपुर्वी सुनील हा वनिता कुर्डेकर यांच्या घरी आल्याची माहिती महेश धुमाळ याला मिळाली. त्याने फसवणूक झालेल्या त्याच्या इतर साथीदारांना बोलावून सुनील नऱ्हे येथे जाऊन बेदम मारहाण केली, ज्यात त्याचा मृत्यू झाला.
अधिक वाचा –
दारू पिली आणि पाण्याची बाटली डोक्यात गेली, थेट एकनाथ शिंदेंचे नाव घेऊन पोलिसांना केला फोन, प्रकरण वाचून शॉक व्हाल
पुणे शहर आणि जिल्ह्यात चारचाकी चोरणाऱ्या टोळीचा म्होरक्या गजाआड; मावळमध्येही केलेली चोरी