व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, October 16, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘जल जीवन मिशन’ अंतर्गत पूर्ण झालेल्या पाणीपुरवठा योजनांच्या देखभाल दुरूस्तीसाठी स्थानिक कारागिरांना प्रशिक्षण दिले जाणार

जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनांच्या कामाच्या प्रगतीचा मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्याकडून आढावा

Team Dainik Maval by Team Dainik Maval
February 6, 2025
in महाराष्ट्र
Water Supply Scheme Jal Jeevan Mission

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : जल जीवन मिशनच्या माध्यमातून राज्यात ग्रामीण भागात प्रत्येक घराला कार्यात्मक घरगुती नळजोडणी देण्यात येते. पूर्ण झालेल्या योजनांच्या देखभाल दुरुस्तीसाठी स्थानिक कारागिरांना प्रशिक्षण देऊन त्यांची क्षमता बांधणी करण्याची योजना पाणी पुरवठा विभागामार्फत राबविण्यात येणार आहे. याची प्रशंसा करुन इतर विभागांनी देखील त्यांच्या मालमत्तांची देखभाल दुरुस्ती स्थानिकरित्या उपलब्ध कारागिरांकडून करुन घेण्यासाठी त्यांची क्षमता बांधणी करण्याबाबत विचार करावा, असे निर्देश मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी दिले.

पाणी पुरवठा आणि स्वच्छता अभियानाच्या शिखर समितीची बैठक मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झाली. या बैठकीत त्यांनी जल जीवन मिशन कामाच्या व्याप्ती घटकाचा त्यांनी आढावा घेतला. यावेळी पाणी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल, वित्त विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, जल जीवन मिशनचे अभियान संचालक ई.रविंद्रन, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा यांच्यासह संबंधित वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. केंद्रीय जल शक्ती मंत्रालयाचे प्रतिनिधी तसेच राष्ट्रीय जल जीवन अभियान संचालक अरुण केंभवी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

जल जीवन मिशन प्रगतीचा आढावा –
राज्यात एकूण 40,297 गावे असून 1,00,404 वस्त्या आहेत. यातील एकूण 1.46 कोटी लक्ष्यित घरांपैकी 1.29 कोटी घरांना कार्यात्मक नळ जोडणी (एफएचटीसी) पुरविण्यात आली आहे. महाराष्ट्राने नळ जोडणी देण्याच्या बाबतीत 88.08 टक्के यश मिळवले आहे, जे राष्ट्रीय सरासरी 79.71 टक्के पेक्षा जास्त आहे. 43,241 योजनांपैकी (यामध्ये पीव्हीटीजी जनमान योजना समाविष्ट आहेत आणि शाळा व अंगणवाड्या वगळल्या आहेत) 43,182 योजनांसाठी (99.86 टक्के) कामाचे आदेश देण्यात आले आहेत. यापैकी 28,110 योजनांमध्ये (65.21 टक्के) काम प्रगतीपथावर असून 15,010 योजनांची (34.82 टक्के) कामे पूर्ण झाली आहेत.

राज्यातील 81,522 शाळांपैकी 80,876 शाळांना (99.20 टक्के) नळ जोडणी प्रदान करण्यात आली आहे. तर, 90,664 अंगणवाड्यांपैकी 89,386 अंगणवाड्यांना (98.59 टक्के) नळ जोडणी देण्यात आली आहे. वित्तीय वर्ष 2024-25 मध्ये 26 जानेवारी 2025 पर्यंत जल जीवन मिशनच्या अंमलबजावणीसाठी एकूण 4,925.24 कोटी रुपये खर्च झाले असून वित्तीय वर्ष 2023-24 मध्ये एकूण 17,296.02 कोटी रुपये खर्च झाले असल्याची माहिती यावेळी विभागामार्फत देण्यात आली.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– परीक्षा केंद्रांवर ड्रोनद्वारे निगराणी, 500 मीटर परिसरात झेरॉक्स सेंटर बंद ; दहावी-बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी सुक्ष्म नियोजन
– मंत्रिमंडळाचा निर्णय : वर्ग-२ च्या जमिनी वर्ग-१ मध्ये रुपांतरणाच्या अभय योजनेस वर्षभराची मुदतवाढ
– श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावरील संत तुकाराम महाराजांचे भव्य-दिव्य मंदिर वर्षभरात पूर्ण होणार – पाहा कसे असणार हे मंदिर


dainik maval jahirat

Previous Post

श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावरील संत तुकाराम महाराजांचे भव्य-दिव्य मंदिर वर्षभरात पूर्ण होणार – पाहा कसे असणार हे मंदिर

Next Post

रास्त भाव दुकान परवाना मिळविण्यासाठी 15 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन – वाचा सविस्तर

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Fair-Price-Ration-Shop

रास्त भाव दुकान परवाना मिळविण्यासाठी 15 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन - वाचा सविस्तर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Distribution of bicycles to girls in Kusavali village joint initiative by Lions Club Union Bank Marathi Journalists Association Maval

कुसवली गावात मुलींना सायकलींचे वाटप ; लायन्स क्लब, युनियन बँक आणि मराठी पत्रकार संघाचा संयुक्त उपक्रम

October 16, 2026
Lonavala Rural Police bust racket involved in stealing and selling iron worth 16 lakh from construction site

बांधकाम साईटवरील 16 लाख 40 हजार रुपयांचे साडेपंधरा टन लोखंड चोरी करून विकणारे रॅकेट लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून उध्वस्त

October 14, 2026
Organization of various activities in Talegaon Dabhade Municipal Council area under Seva Sankalp Abhiyan 2026

‘नागरिकांची सेवा हाच प्रशासनाचा संकल्प’ : ‘सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत तळेगाव दाभाडे नगरपरिषद क्षेत्रात विविध उपक्रमांचे आयोजन

October 14, 2026
rehabilitation of those displaced by Andra Dam must take place steadfast opposition to enclosed pipeline

आंद्रा धरणग्रस्तांचे पुनर्वसन झालेच पाहिजे ; बंदिस्त जलवाहिनीला कायमचा विरोध!

October 14, 2026
Shekru found in weak state in Vadgaon Maval Forest Range saved released back into wild

Shekaru Rescue : वडगाव वनपरिक्षेत्रात अशक्त अवस्थेत आढळलेल्या ‘शेकरू’ला जीवदान ; निसर्गाच्या सान्निध्यात केले मुक्त

October 13, 2026
Accident

घोरवडेश्वर मंदिर दर्शन करून घरी परतताना काळाचा घाला! सख्ख्या बहिण-भावाचा पुणे-मुंबई महामार्गावर अपघाती मृत्यू

October 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.