तळेगाव दाभाडे शहरातील निलय सोसायटी समोर भरधाव वेगात आलेल्या एका कारने एका सात वर्षीय चिमुरड्याला उडवल्याची घटना घडलीये. सोसायटीच्या गेटच्या बाहेर गेलेला बॉल घेऊन येत असताना हा चिमुरडा कारखाली सापडला. मंगळवारी (दि. 9 जुलै) रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अनिल शिवाजी जाधव (वय 33, रा. तळेगाव दाभाडे) यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संदीप विठ्ठलराव देवकर (रा. मंगरूळ, ता. मावळ) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( child dies in a collision with a speeding car Talegaon Dabhade )
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जाधव यांचा मुलगा सोसायटीच्या आवारात मुलांसोबत खेळत होता. त्यांचा बॉल सोसायटीच्या गेटच्या बाहेर रस्त्यावर गेला. त्यामुळे तो बॉल आणण्यासाठी गेटच्या बाहेर गेला. बॉल घेऊन येत असताना देवकर याने त्याच्या ताब्यातील कार (एमएच 04/एचडी 0569) भरधाव चालवून मुलाला धडक दिली.
मुलाच्या पायावर कारचे चाक गेल्याने तो गंभीर जखमी झाला. अपघात झाल्यानंतर देवकर मुलाला रुग्णालयात घेऊन न जाता निघून गेला, असे फिर्यादीत नमूद आहे. तळेगाव दाभाडे पोलीस प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
अधिक वाचा –
– लोणावळा शहराचे मुख्याधिकारी अशोक साबळे यांच्याकडे तळेगाव नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पदाचा अतिरिक्त कारभार
– ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी पात्रता निकष जाहीर, वाचा कोण होणार लाभार्थी आणि आवश्यक कागदपत्रे
– तळेगाव दाभाडे येथे शिक्षकांसाठी तालुकास्तरीय शिष्यवृत्ती कार्यशाळा ; पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षेबाबत मार्गदर्शन