दहावी आणि बारावीत 90 टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त करुन उत्तीर्ण होणाऱ्या प्रत्येक मंडळातील पहिल्या 5 माजी सैनिक/पत्नी यांच्या पाल्यांना 10 हजार रुपयांचा विशेष गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे. त्यासाठी माजी सैनिकांच्या कुटुंबियांनी 15 सप्टेंबरपर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयास माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आयआयटी, आयआयएम, एम्स अशा नामवंत संस्थांमध्ये प्रवेश मिळालेल्या माजी सैनिकाच्या पाल्यांना 25 हजार रुपये विशेष गौरव पुरस्कार देण्यात येईल. तसेच विविध खेळ, साहित्य, संगीत, गायन, वादन, नृत्य, यशस्वी उद्योजक पुरस्कारप्राप्त, संगणक क्षेत्रात अतिउत्कृष्ट कामगिरी, नैसर्गिक आपत्तीमध्ये बहुमोल कामगिरी, तसेच देश आणि राज्याची प्रतिष्ठा वाढेल, अशा स्वरुपाची लक्षणीय कामगिरी करणारे माजी सैनिक, त्यांच्या पत्नी आणि पाल्यांना या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, मुंबई शहर यांच्याशी संपर्क साधावा. ( Children of ex servicemen who have secured more than 90 percent marks in ssc hsc will get Rs10 thousand )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– दैनिक मावळ विशेष । नारळी पौर्णिमा – “सण आयलाय गो आयलाय गो नारली पुनवेचा…..”
– वडगावमध्ये ‘राखी विथ खाकी’ : मोरया प्रतिष्ठानच्या महिला सहकाऱ्यांनी पोलिस बांधवांना बांधली राखी
– आत्मनिर्भर भारत अभियान अंतर्गत कृषि पायाभूत सुविधा निधी योजना (AIF) कार्यशाळेचे वडगाव इथे आयोजन