रविवारी (25 डिसेंबर) संपूर्ण जगभर भगवान येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन ख्रिसमस म्हणजे नाताळ सण मोठ्या उत्साहात साजरा झाला. महाराष्ट्रातही शहरी भागात नाताळ सण साजरा होताना दिसतो. खासकरुन ख्रिसमसच्या टोप्या घालून बाळगोपाळ या सणाचा आनंद घेताना दिसतात. नाताळ सणाचे औचित्य साधून वडगाव मावळ शहरातील मल्हार रेसिडेन्सी येथे सोमवारी (26 डिसेंबर) बालगोपाळांनी स्वपुढाकाराने विशेष नियोजन करुन छोटेखानी कार्यक्रम आयोजित केला होता.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
पथनाट्य, देशभक्तीपर गीतांवर नृत्य, संगीत खुर्ची अशा कार्यक्रमांचे नियोजन करुन अखेरीस सर्व उपस्थितांना एक एक वृक्ष वाटप करुन लहानग्यांनी सर्वांचेच मन जिंकले. यात खासकरुन ‘मल्हार रेसिडेन्सी कुटुंबातील’ लहान मुलांनी सादर केलेल्या पथनाट्यातून सर्वांचेच प्रबोधन झाले आणि लहानग्यांनीच प्रौढांचे कान टोचल्याचे दिसून आले. पाणी बचावाचा संदेश देणारे हे पथनाट्य सर्वांना विचार करायला लावणारे होते. त्यानंतर काही लहान मुलांनी देशभक्तीपर गीतांवर नृत्य सादर केले. तर अखेरीस सर्वांना पर्यावरणाचे महत्व पटावे, याकरिता एक एक झाड भेट म्हणून देण्यात आले.
लहान मुलांच्या या कल्पकतेचे आणि पुढाकाराचे मावळ तालुका पंचायत समितीचे माजी सभापती गुलाब म्हाळसकर यांनी कौतूक केले. तसेच, वडगाव भाजपाचे उपाध्यक्ष दिपक भालेराव यांनीही बालगोपाळांच्या नेतृत्व गुणाचे कौतूक केले. हा कार्यक्रम यशस्वी व्हावा, यासाठी महेश दुधाणे आणि टीमने लहान मुलांना चांगला पाठींबा दिला.
अधिक वाचा –
– शिवसेना नेते, आमदार उद्धव ठाकरे यांचे विधान परिषदेतील संपूर्ण भाषण, वाचा जसेच्या तसे
– तळेगाव दाभाडे । ‘विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे भविष्यवेधी शिक्षण देता यावे’, आश्रमशाळेतील अध्यापकांची प्रशिक्षण कार्यशाळा