पुणे जिल्ह्यात पौड, लोणावळा आणि हवेली पोलीस ठाणे हद्दीत नववर्षाचे स्वागत करण्यासाठी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी, तसेच 1 जानेवारी 2024 रोजी विजयस्तंभ पेरणे फाटा येथे मानवंदना देण्यासाठी विविध ठिकाणाहून बहुसंख्य अनुयायी मानवंदना देण्यासाठी विविध ठिकाणाहून येत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधिक्षक अंकित गोयल यांनी 25 डिसेंबर रोजी रात्री 12.10 वाजेपासून ते 7 जानेवारी 2024 रोजी रात्री 12 पर्यंत च्या कालावधीत महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकाराअंतर्गत सर्व उप विभागीय पोलीस अधिकारी, बंदोबस्ताचे अधिकारी यांना अधिकार प्रदान केले आहेत. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
रस्त्यावरील किंवा रस्त्याने जाणाऱ्या मिरवणुकीतील किंवा जमावातील लोकांनी कशारितीने चालावे त्यांनी वर्तणुक किंवा वागणूक कशी ठेवावी. कोणत्याही मिरवणुका या कोणत्या मार्गाने, कोणत्या वेळात काढाव्यात किंवा काढू नयेत असे मार्ग व अशा वेळा विहित करणे, सर्व मिरवणुकीच्या व जमावांच्या प्रसंगी व उपासनेच्या वेळी व कोणत्याही रस्त्याहून किंवा सार्वजनिक जागी किंवा सार्वजनिक स्थळी गर्दी होणार असेल किंवा अडथळा होण्याचा संभव असेल अशा सर्व प्रसंगी अडथळा न होवू देणे यासाठी योग्य ते आदेश देणे, सर्व रस्त्यावर व रस्त्यामध्ये घाट किंवा घाटावर सर्व धक्यावर व धक्यामध्ये आणि सार्वजनिक स्नानांच्या, कपडे धुण्याच्या व उतरणेच्या जागांच्या ठिकाणी व जागामध्ये, देवालय आणि इतर सर्व सार्वजनिक स्थळी सुव्यवस्था राखणेसाठी योग्य ते आदेश देणे, कोणत्याही रस्त्यात किंवा रस्त्याजवळ ढोल, ताशे व इतर वाद्ये वाजविण्याचे व गाणी गाण्याचे, शिंगे वइतर कर्कश्श वाद्ये वाजविण्याचे विनियमन करणे व त्यावर नियंत्रण ठेवणेसाठी योग्य ते आदेश देणे, कोणत्याही सार्वजनिक जागेत किंवा जागेजवळ किंवा कोणत्याही सार्वजनिक करमणुकीच्या ठिकाणी लोकांना उपद्रव होऊ नये म्हणून ध्वनिपेक्षकाचा (लाऊडस्पीकर) उपयोग करणे व त्यावर नियंत्रण ठेवणेसाठी योग्य ते आदेश देणे, याबाबत हे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत.
सक्षम प्राधीकाऱ्यांनी या अधिनियमांची कलमे 33, 35, 37 ते 40, 42, 43 व 45 अन्वये दिलेल्या कोणत्याही आदेशास अधीन असलेले व त्यास पुष्टी देणारे योग्य आदेश देण्याचेही आदेशात नमूद केले आहे. ( Christmas New Year and Shaurya Day special powers to all police officers of pune for security )
अधिक वाचा –
– नागरिकांनो, नियमांचे पालन करा..! नाताळ सण, नववर्ष आणि शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर कामशेत शहरात पोलिसांकडून रुट मार्च
– ‘वडगाव बाजारपेठेतील मुख्य रस्ता आहे तोच कायम ठेवा’, बाजारपेठेतील घरमालकांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन
– पवना शिक्षण संकुलामध्ये यु.पी.एल. कंपनीच्या 50 लाख निधीतून बांधण्यात आलेल्या अद्ययावत स्वच्छतागृहाचे लोकार्पण